वॉशिंग्टन :  US floods : 'इडा' चक्रीवादळाचा (Cyclone Ida ) असा काही तडाखा बसला आहे की, यापुढे अमेरिका पूर्णपणे हतबल वाटत आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व अमेरिकेत (America) प्रकोप निर्माण झाला आहे. विशेषतः न्यूयॉर्क (New York ) आणि न्यू जर्सी (New Jersey) ही शहरे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. येथील रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. भुयारी मार्गावर तुडुंब भरले आहेत. अनेक भागात वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला झाला. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, वादळानंतर मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मेट्रो लाईन पाण्याखाली गेल्या आहेत आणि कार रस्त्यावर तरंगताना दिसत आहेत. आतापर्यंत किमान 41 लोकांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रस्ते तलाव बनले आहेत, बाधित लोकांना मदत करण्याची व्यवस्था केली जात आहे. नॅशनल यॉर्क सर्व्हिसने न्यूयॉर्क शहरात प्रथमच पूर आल्याने आपत्कालीन इशारा जारी केला आहे. दुसरीकडे, न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी आणीबाणीची स्थिती घोषित केली. ते पुढे म्हणाले, अनेक भाग पूर्णपणे अंधारात बुडाले आहेत. बुधवारी रात्री वीज खंडित झाल्याच्या 81740 तक्रारी प्राप्त झाल्या. (छायाचित्र स्रोत: स्काय न्यूज)



'डब्ल्यूपीव्हीआय' या वेबसाईटनुसार, न्यू जर्सीतील ग्लॉसेस्टर काउंटीलाही पाऊस आणि पुराच्या कहरात वादळाचा सामना करावा लागला आहे. यामुळे परिसरातील शेकडो घरांचे नुकसान झाले. पेसेकचे महापौर हेक्टर लोरा यांनी सांगितले की, पुरात कार वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचवेळी, अपार्टमेंटच्या तळघरातून नऊ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये तीन मृत्यू नोंदवले गेले आहेत, तर मेरीलँड आणि कनेक्टिकटमध्ये प्रत्येकी एकाला पावसामुळे आलेल्या फ्लॅश फ्लूमुळे नोंदवले गेले आहे. सर्वत्र पाणी दिसत आहे. मेट्रो स्टेशनला धबधब्याचे स्वरुप वाहत आहेत. (फोटो स्त्रोत: ट्विटर)



बिघडत चाललेली परिस्थिती पाहता न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील सामान्य लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहेत. दोन्ही प्रांतांमध्ये आपत्कालीन वाहने वगळता इतर कोणत्याही वाहनास रस्त्यावर परवानगी नाही. (फोटो: गल्फ न्यूज)



खराब हवामानामुळे न्यू जर्सीमधील ट्रान्झिट रेल्वे सेवा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर नेवार्क लिबर्टी विमानतळावर पाणी भरल्याने सर्व प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. दुसरीकडे, न्यूयॉर्कमध्येही प्रशासनाने भुयारी सेवा बंद केली आहे. भुयारी मार्ग भरला आहे, आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (फोटो स्त्रोत: ट्विटर)



त्याचवेळी, 172 मैल प्रति तास वेगाने आलेल्या इडा चक्रीवादळाने लुईझियानामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. येथील बहुतांश रस्ते तलाव बनले आहेत. झाडे आणि इमारतींच्या ढिगाऱ्यामुळे वाहतूक पूर्ववत होऊ शकली नाही. वीज पुरवठाही ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)



परिस्थिती अशी झाली आहे की, बचाव पथकाला लोकांना वाचवण्यासाठी बोटींचा वापर करावा लागत आहे. ज्या रस्त्यांवर कालपर्यंत हायस्पीड वाहने चालत असत, आज तिथे बोटी धावत आहेत आणि कार बोटींप्रमाणे तरंगत आहेत. त्याचवेळी, पुरामुळे मॅनहॅटनसह न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क शहरातील प्रमुख रस्ते बंद झाले आहेत. (फोटो स्त्रोत: रॉयटर्स)



हवामान खात्याचे सांगितले आहे की धोका अजून टळलेला नाही. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. काही भागात जेथे बाजार खुले होते, तेथेही आता शांतता आहे. (फोटो स्त्रोत: फ्रान्स 24)