`या` नेत्याने स्वतःचाच अश्लिल व्हिडिओ केला लीक, जाणून घ्या कारण...
हा अश्लिल व्हिडीओ एका वेबसाईटवरही अपलोड करण्यात आलाय
देशातील आणि जगातील अनेक लोकांच्या संमतीशिवाय त्याचे अश्लिल व्हिडिओ (Adult Video) व्हायरल झाल्याचे आपण वाचलं असेल. यामुळे अनेकांना त्याचा त्रासही सहन करावा लागला आहे. पण एखाद्या नेत्याने जाणूनबुजून त्याचा अश्लिल व्हिडिओ (Adult Video) लीक केल्याचे तुम्ही कधी ऐकलंय का? या घटनेवर तुमचा विश्वास बसणार नाही पण असं खरेच झालं आहे. अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधी जेरी नॅडलर (Jerry Nadler) यांची जागा घेण्यासाठी प्रचार करत असलेल्या माईक इटकिस (Mike Itkis) यांनी हा धक्कादायक प्रकार केला आहे. माईक यांनी स्वतःचाच एक अॅडल्ट व्हिडीओ (Adult Video) एका वेबसाईटवर पोस्ट केला आहे.
न्यूयॉर्कच्या 12 व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या माईक इटकिस यांनी "बकेट लिस्ट बोनान्झा" नावाच्या 13 मिनिटांच्या अश्लिल व्हिडीओमध्ये निकोल सेजसोबत काम केले आहे. एका वृत्तानुसार, मात्र हा व्हिडिओ तीन महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
"मी याबद्दल बोललो नाही तर, या समस्येबद्दल माझी बांधिलकी दर्शवत नाही, असे होईल. प्रत्यक्षात माझ्यासाठी हा एक मोठा शिकण्याचा अनुभव होता," असे माईक यांनी म्हटलं आहे. नॅडलर यांचा या निवडणूकीत पराभूत होण्याचा अंदाज असलेल्या माईक यांनी लैंगिक-सकारात्मक दृष्टिकोनावर आपली मोहीम आखली आहे आणि गर्भपाताच्या अधिकाराला पाठिंबा दिला आहे. तसेच व्यभिचाराचे कायदे समाप्त करण्यासाठी आणि विवाहामध्ये सरकारी सहभाग समाप्त करण्यासाठी माईक यांनी निवडणूक मोहिम आखली आहे.