मुंबई : भारत दौऱ्याला निघण्याच्या काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय संस्कृती, कलाविश्व यांच्याविषयी काही ट्विट करत साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. आयुष्यमान खुरानाच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाची स्तुती करणारं ट्विट केल्यानंतर आता ट्रम्प यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका ट्विटचीही दखल घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाहुबली' या चित्रपटातील काही दृश्य आणि गाण्याच्या साथीने एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रभास ऐवजी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आला आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा दिसत आहेत. ट्रम्प यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत भारतातील माझ्या मित्रांसमेवत वेळ व्यतीत करण्यासाठीआपण उत्सुक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 


एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. ज्यानंतर आता थेट ट्रम्प यांनाच बाहुबली रुपात सादर केल्यामुळे चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये इव्हांका ट्रम्प, मेलेनिया ट्रम्पसुद्धा दिसत आहेत. हा व्हि़डिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी


दरम्यान, भारत दौऱ्यावर येत असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांच्या कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला आहे. ट्रम्प आता गांधी आश्रमाला भेट देणार नसल्याचं म्हटलं जात आहे, पण या कार्यक्रमातही काही बदल होऊ शकतात. शिवाय त्यांच्या रोड शोमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.