मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था असताना त्यांच्यावर हल्ला केला. ही हिम्मत कुण्या व्यक्तीनं नाही तर एका किड्यानं केली आहे. सुरक्षा व्यवस्थेला हुल देऊन त्याने जो बायडन यांच्यावर हल्ला केला. परदेश दौऱ्यादरम्यान या किड्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि एकच खळबळ उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो बायडन पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जात असताना त्यांच्या मानेवर एका किड्यानं हल्ला केला. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना हा प्रकार घडला. सर्व सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून हा किडा जो बायडन यांच्या मानेवर आला. बायडन यांनी तातडीनं त्याला मानेवरून हटवलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने मानेला हात लावून पाहिलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 


President Biden was hit in the neck with a cicada while chatting with a uniformed military officer before boarding Air Force One for a week-long tour of western Europe https://t.co/eWdBtK8jN2 pic.twitter.com/6wFGMxsLgN



हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी तातडीनं तिथे उपस्थित असलेल्या माध्यमांशी संवाद साधताना सिकाडा किड्यापासून सावध राहा अशा सूचनाही दिल्या आहेत.


बायडन आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी युनायटेड किंगडमला जात होते. त्यावेळी तिथे पत्रकारही उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांच्या विमानाला किड्यांनी टार्गेट केलं. तर जो बायडन यांच्या मानेवर किड्याने हल्ला केला. यामुळे विमानाचे उड्डाण 7 तास उशिरा झाले. 


महत्त्वाचे म्हणजे या कीटकांनी विमानाच्या इंजिनमध्ये प्रवेश केला होता. वॉशिंग्टन हा अमेरिकेतील एक भाग आहे ज्यास सिकाडा किड्यांचा खूप जास्त त्रास होतो. सिकाडा किडे हळूहळू अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये त्यांनी घुसखोरी केली आहे.