US President Salary Per Month: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जगभरात चर्चा असतानाच आता या महासत्ता असणाऱ्या देशाचं अध्यक्षपद नेमकं कोणाच्या हाती जाणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. जाणून आश्चर्य वाटेल, पण अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद हे एक संघीय कर्मचारी पद असून, या सेवेसाठी दर महिन्याला वेतनश्रेणी लागू असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाही सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळी वेतनश्रेणी या व्यक्तीला लागू असते. सर्वसामान्य अमेरिकी व्यक्ती वर्षभरात सरासरी 63,795 डॉलर (53 लाख रुपये) इतकी कमाई करते. तर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीला वर्षभरात 400,000 डॉलर (3.36 करोड़ रुपये) इतकं वेतन मिळतं. फक्त पगारावरच ही गणितं थांबत नाहीत. तर, राष्ट्राध्यक्षांना वाढीव भत्ते, ट्रॅव्हल अलाऊन्स आणि एंटरटेन्मेंट अलाऊन्सही मिळतो. पदावरून निवृत्त झाल्यानंतर या मंडळींना पेंशन आणि इतर सुविधाही मिळतात. 


अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष हे सर्वोच्च नागरी पद असून या पदाच्या वरिष्ठतेमुळं राष्ट्राध्यक्षांना एका वर्षात साधारण 400,000 डॉलर इतकं वेतन मिळतं. त्यांना 50,000 डॉलर (42 लाख रुपये) चं एक्सपेंस अलाउंस, 100,000 डॉलर (84 लाख रुपये) चं नॉन टेक्सेबल ट्रेवल अकाउंट, 19,000 डॉलर (16 लाख रुपये) चं एंटरटेनमेंट अलाउंस इतकी रक्कम मिळते. ही संपूर्ण रक्कम मिळून 569,000 डॉलर (4.78 करोड़ रुपये) वर पोहोचतो. 


हेसुद्धा वाचा : तिशीनंतर महिलांनी काय खाणं टाळावं? 


राष्ट्राध्यक्षांना या पदावर निवडून आल्यानंतर व्हाईट हाऊसला नव्यानं सजवण्यासाठी  100,000 डॉलर मिळतात, असं बीबीसीच्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला मात्र कोणतीही रक्कम मिळत नाही. पगाराव्यतिरिक्त अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना लिमोसिन, द बीस्ट, मरीन वन आणि एयर फोर्स वनमध्ये मोफत प्रवासाची सुविधा असते. याशिवाय व्हाईट हाऊसमध्येही मोफत मुक्कामाची संधी मिळते. वर्षभर आरोग्यावरील खर्चासाठीची रक्कम, अधिकृत प्रवासासाठीचा संपूर्ण खर्च आणि वर्षभराला 200,000 डॉलर (1.68 करोड़ रुपये) पेंशन स्वरुपातील रक्कम हा लाभही लागू असतो.