एका महिलेने लॉरियल (L'Oreal) या  हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स कंपनीवर खटला दाखल केला आहे. लॉरियलच्या (L'Oreal) उत्पादनाचा वापर केल्याने गर्भाशयाचा कर्करोग (Cancer) झाल्याचा या आरोप महिलेने केला आहे. अमेरिकेतील (US) वॉशिंग्टन शहरात हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. या महिलेच्या आरोपांमुळे लॉरियलच्या (L'Oreal) उत्पादनाचा वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळची वॉशिंग्टनची (washington) असणाऱ्या जेनी मिशेल या महिलेने लॉरियलवर (L'Oreal) गंभीर आरोप केले आहेत. जेनी मिशेल यांच्या वकिलाने सांगितले की त्या गेल्या दोन दशकांपासून लॉरियल कंपनीची केस स्ट्रेटनिंग उत्पादने वापरत होत्या. त्यामुळेच त्याला व्हल्व्हर कॅन्सर (vulvar cancer) झाला.


"मिशेल बऱ्याच काळापासून धोकादायक उत्पादनांना बळी पडत आहेत. त्यांनी फ्रेंच कॉस्मेटिक कंपनी लॉरियलच्या अमेरिकेतील शाखेकडे नुकसान भरपाई मागितली आहे," असे जेनी यांचे वकील बेन क्रंप म्हणाले. मिशेलची यांचे हे प्रकरण असंख्य अशा प्रकरणांपैकी एक आहे. या कंपन्या आपला नफा वाढवण्यासाठी अनेक दिवसांपासून कृष्णवर्णीय महिलांची दिशाभूल करत आहेत, असे क्रंप म्हणाले. मात्र या प्रकरणावर लॉरियलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


व्हल्व्हर कर्करोग म्हणजे काय?


काही दिवसांपूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये केस सरळ करणाऱ्या रासायनिक उत्पादनांचा वापर धोकादायक ठरू शकतो, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो, असेही त्यात म्हटलं होतं. या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या स्त्रिया वर्षातून चार वेळा या उत्पादनांचा वापर करतात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग (Uterine cancer) होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा दुप्पट असते.


लॉरियलच्या उत्पादनांमध्ये पारा (lead)


दरम्यान, काही वर्षांपूर्वी लॉरियल इंडिया या सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या पाच उत्पादनांमध्ये घातक पाऱ्याचे अंश आढळून आल्याचे महाराष्ट्र फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) म्हटले होते.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार त्वचेचा रंग उजळ करण्याच्या उत्पादनांमधील पाऱ्यामुळे मूत्रपिंड आणि त्वचेचे विकार होऊ शकतात. कंपनीने उत्पादनांमध्ये पारा नसल्याचा दावा केला आहे.