नवी दिल्ली : डोकलाम विवादावर चीनकडून सतत भडकावणारे वक्तव्य होत आहे. या प्रकरणात अमेरिकेने भारताचं समर्थन करत चीनला आव्हान दिलं आहे. वॉशिंगटनच्या स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्ट्डिजचे सीनियर तज्ज्ञ जॅक कूपर यांनी म्हटलं आहे की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कूपर यांच्यामते अमेरिका चीनच्या वाढत्या शक्तीला बॅलेन्स करण्याचा सतत प्रयत्न करत आहे आणि भारत एक असं राष्ट्र आहे जे त्यांच्या या पयत्नांना हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो. कूपर यांनी हे देखील म्हटलं आहे की, अमेरिकेने दर युद्धात उतरण्याची घोषणा जरी केली तरी चीन हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करेल.


डोकलाम सीमा वादावर चीनची सेना आणि सरकार भारताला धमक्या देत आहेत. चीनी सेनेचे प्रवक्ते भारतीय सेनेला धमकी देत म्हणतात की, जर त्यांनी डोकलाममधून माघार नाही घेतली तर याचा खूप गंभीर परिणाम होईल. भारताने आधी डोकलाममधून आपली सेना मागे घ्यावी.


चीनकडून सिक्किम-भूटान-तिबेत ट्राई जंक्शनवर हक्क सांगण्यात येतोय. चीनकडून डोकलाममध्ये रस्ते बनवण्याचं काम सुरु झाल्यानंतर त्याला भूटान आणि भारताने विरोध केला. पण चीनने नाही ऐकलं. त्यानंतर भारताने तेथे जवान तैनात केले.