नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या आठवणींचा बॅकअप घेऊ शकाल, तुमचा मेंदू एका चीपद्वारे कंट्रोल होऊ शकतो, अनेक आजार ठिक होऊ शकतात असं जर कोणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे कोणत्या सिनेमात घडत नाहीय. तर  एलन मस्क हे भविष्यामध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतायत. एलन हे अमेरिकेचे व्यावसायिक असून त्यांनी इलेक्ट्रीक कार प्रत्यक्षात आणून दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलन मस्क यांची कंपनी न्यूरालिंक गेल्या काही वर्षांपासून मानवी मेंदू समजून घेणाऱ्या चीपवर काम करतेय. कंपनीने डुक्कराच्या मेंदूत ही चीप बसवून त्यावर प्रयोग करुन पाहीला. नाण्याच्या आकाराची चीप डुक्कराच्या मेंदूजवळ बसवली होती. अशा प्रकारची चीप येणाऱ्या काळात मानवी मेंदूमध्ये देखील बसवली जाऊ शकते. स्कल सर्जरीच्या माध्यमातून ही प्रक्रीया करता येऊ शकते. 


या चीपच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात एलन मस्क यांनी ३ डुक्करांबद्दल माहीती दिली. त्यातील एकाच्या डोक्यात चीप होती. दुसऱ्याच्या डोक्यातून चीप लावून काढण्यात आली होती. तर तिसऱ्याला यापैकी काही करण्यात आलं नव्हतं. 



न्यूरालिंकच्या टीमने केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरला. Gertrude नावाच्या डुक्कराला चीप लावलेली. त्याचे विचार वायरलेस सिग्नलमधून कम्प्यूटरवर दिसू लागले होते.


आजार येतील नियंत्रणात 


ही पाथब्रेकींग चीप मानवी मेंदूचे सिग्लन वाचू शकते. यामुळे मेमरीचा बॅकअप घेणं शक्य आहे. म्हणजे स्मरणशक्ती संदर्भातील आजार, स्पायनल कॉर्ड आणि मूव्हमेंट संदर्भातील आजार ठीक होऊ शकतील असे एलन मस्क सांगतात. मेंदू नियंत्रणात आणून वैज्ञानिकदृष्ट्या काही करुन घेता येणार आहे. 


एलन मस्क यांच्या चीपमुळे मेंदूचे सिग्नल सहज रेकॉर्ड होतील. पण ते डिकोड करणं हे मोठ आव्हान असल्याचे काही न्यूरोसर्जनचे मत आहे. कोणीही आतापर्यंत शंभर टक्के ही भाषा समजू शकला नाहीय. मानवाच्या शरीरातील इतर सेल्स यामुळे कळतात असेही ते सांगतात.