ताशकंद : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.  कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच देशांतील आर्थिक घडी विस्कटली आहे. आता ही विस्कटलेली घडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी अनेक देश शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यापैकीच एक म्हणजे उज्बेकिस्तान (Uzbekistan). उज्बेकिस्तान मध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी उज्बेकिस्तानने एका पाऊल पुढे टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्बेकिस्तानने 'सुरक्षित यात्रा गॅरंटी' हे अभियान सुरू केले आहे. या अभियाना अंतर्गत ज्या परदेशी पर्यटकाला देशात कोरोनाव्हायरसची लागण झाली, तर त्याला ३,००० डॉलर म्हणजे जवळपास २ लाख २६ हजार रुपये देणार, अशी घोषणा उज्बेकिस्तान सरकारने केली आहे.


यासाठी उज्बेकिस्तान सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नवे नियम अमलात आणले आहे. यामध्ये परदेशी पर्यटक स्थानिक टुरिस्ट गाइड्सहच फिरतील, हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पर्यटन स्थानकांमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेची योग्य खबरदारी घेतली आहे की नाही यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रं घेणं बंधनकारक आहे.


विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उज्बेकिस्तानचे राष्ट्रपती शवकात मिर्जीयोयेव यांनी हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे चीन, , इज्राइल, जपान आणि दक्षिण कोरिया या देशातील नागरिक पर्यटनासाठी उज्बेकिस्तानमध्ये जाता येणार आहे. तर युरोपहून येणाऱ्या पर्यटकांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहवं लागणार आहे.