नवी दिल्ली : अमेरिकेत सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. शुक्रवारी अमेरिकेने आपला राष्ट्रीय प्रार्थना दिन साजरा केला. या दरम्यान वैदिक शांती मंत्रांचा उच्चार करण्यात आला. रोज गार्डनमध्ये यासाठी खास हिंदू पंडितांना बोलवण्यात आलं होतं. स्वामी नारायण मंदिरचे पुजारी हरीश ब्रह्मभट्ट यांनी वैदिक मंत्रांचा उच्चार केला. प्रार्थना सभेत सर्व धर्मगुरुंना बोलवण्यात आलं होतं. या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी प्रार्थन करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना पुढे सुपरपावर अमेरिका देखील असहाय्य आहे. येथे आतापर्यंत ७६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये चितेंचं वातावरण आहे. ट्रम्प यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट नेगेटीव्ह आला आहे. ट्रम्प यांनी म्हटलं कीस ते आणि व्हाईट हाऊसमधील कर्मचारी रोज कोरोना चाचणी करतील.


कोरोनामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात आहे. यातून आता ट्रम्प कसा मार्ग काढतात हे पाहावं लागेल. त्यातच काही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे.