Valentine’s Day 2023: Singles असाल म्हणून काय झालं? पार्टनरशिवाय सेलिब्रेट करा `व्हॅलेंटाइन डे`!
Valentine’s Day 2023 : खरं तर व्हॅलेंटाईन डे (व्हॅलेंटाईन डे 2023) हा प्रेमाचा दिवस. तुम्ही ज्याच्यावर जास्त प्रेम करता त्याच्यासोबत हा दिवस साजरा करतात. पण जगात असे अनेकजण आहेत ज्यांना जोडीदार नाही. मग singles लोकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा की नाही?
Valentine’s Day 2023: फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट खुणावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा याचं प्लॅनिंग अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे करत करतात. शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी छान गिफ्ट देऊन सरप्राइज देण्याचा विचार अनेकजण करतात. उद्यापासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. पण आता प्रश्न आहे की तुमच्या आमच्या सारखे मुलं मुली जे सिंगल आहेत किंवा अविवाहित आहेत त्यांनी व्हॅलेंटाईन डेला काय करावे? जे लोक रिलेशनशीपमध्ये नाही किंवा सध्या प्रेमात नाहीत ते इतर कपलप्रमाणे आपल्या मित्र मैत्रिणीप्रमाणेच व्हॅलेंटाईन डे आनंदाने साजरा करू शकतात का? तर होय.
व्हॅलेंटाईन डे फक्त रिलेशनमध्ये असणाऱ्या प्रेमी युगलांसाठी राखीव दिवस नसतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर, मित्रांवर, मैत्रिणींवरही प्रेम करू शकता. म्हणून जर तुमचे मित्र त्यांच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात व्यस्त असतील, तर हा दिवस खास पद्धतीने साजरा करा आणि तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता हे स्वत:ला पटवून द्या. चला तर मग जाणून घेऊया...
सहलीची योजना करा
कोणताही प्रसंग साजरा करायचा असेल तर पिकनिक प्लॅन करतोच. तुम्ही अविवाहित असाल आणि तरीही तुम्हाला व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा असेल तर तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता. तुम्हा आवडेल त्याठिकाणी फिरायला जाऊ शकता. जर तुम्हाला प्रवासासाठी जोडीदाराची गरज असेल तर तुम्ही कुटुंब किंवा मित्र- मैत्रींणीसोबत फिरायला जाऊ शकता.
पिकनिक उत्तम पर्याय
व्हॅलेंटाईन डे ला फक्त कपल फिरायला जाऊ शकतात का? तर असे नाही. तुम्ही अविवाहित आहात आणि कुटुंबासोबत दिवस साजरा करायचा आहे, मग फॅमिली पिकनिकची योजना करा. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील नाते अधिक घट्ट होईल.
वाचा: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
मित्रांबरोबर वेळ घालवतोय
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी रिलेशनशिपमध्ये असलं पाहिजे असं नाही. या दिवशी तुम्ही अविवाहित मैत्र-मैत्रिणीसोबतही मजा करू शकता.
तुम्हाच्या आवडीची कामे करा
या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास, स्वतः काहीतरी करून पहा आणि मित्र-परिवारासोबत आनंद लुटा.
खूप खरेदी करा
व्हॅलेंटाईन डे दिवस स्वत:साठी जगा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्ही इतरांवर प्रेम करू शकाल. शॉपिंग करा, पार्लरमध्ये जा, स्ट्रीट फूड खा, किंवा घरबसल्या कोणतीही मालिका पाहू शकतो.