मुंबई : एका सीरियल किलरच खळबळजनक सत्य समोर आलं आहे. ज्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. या सीरियल किलरच्या निशाण्यावर असतात लहान मुलं. धक्कादायक बाब म्हणजे सीरियल किलर लहान मुलांची हत्या करून त्यांच रक्त प्यायचा. त्याच्या या अघोरी कृत्यामुळे स्थानिक त्याला 'नर पिशाच' म्हणायचे. एक दिवस हा सीरियल किलर जमावा्या हातात मिळाला. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीरियल किलरने कबुल केलं होतं की, त्याने 10 मुलांची हत्या केली होती. एवढंच नव्हे तर या हत्येनंतर त्याने त्या मुलांचं रक्त प्यायला होता. 



अमली पदार्थ देऊन करायचा हत्या 


मास्टेन वंजाला  (Masten Wanjala)नावाचा सीरियल किलर दोन दिवस अगोदरच जेलमधून पळाला. यानंतर पोलीस त्यांचा तपास करत होते. मात्र पोलिसांच्या अगोदरच जमावाने या सीरियल किलरला शोधलं. एवढंच नव्हे त्याला एवढी मारहाण केली की, यामध्ये त्या नर पिशाचाचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी जेव्हा या सीरियल किलरला अटक केली होती. तेव्हा त्याने आपला गुन्हा स्विकार केला होता. लहान मुलांना अमली पदार्थ देऊन तो बेशुद्ध करायचा. त्यानंतर त्यांची हत्या करायचा. हा नराधम एवढ्यावरच थांबायचा नाही तर त्यांचं रक्त देखील प्यायचा. 


कोर्टात सादर करण्याअगोदरच पळाला 


मिररच्या वृत्तानुसार, हे प्रकरण केनियाच्या नैरोबीचे आहे. अलीकडेच येथील रहिवासी असलेल्या मास्टेन वांजलाला अटक करण्यात आली. जुलैमध्ये दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर त्याचे वास्तव उघड झाले. पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात होते पण त्याआधीच तो पळून गेला.


या वयाची मुलं होती निशाण्यावर 


पोलीस तपासात उघड झाले की वंजाला बहुतेक लक्ष्य 12 ते 15 वयोगटातील मुले होती. ज्यांना तो मादक पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा किंवा कधीकधी तो थेट चाकूने मारायचा. यानंतर, त्याने काही मुलांचे रक्त पिणे देखील स्वीकारले. तो मुलांना फुटबॉल प्रशिक्षक असल्याचा बहाणा करून मुलांना घेऊन जायचा.