Latest Viral News: वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. या क्षेत्रात संशोधन मोठ्या प्रमाणात होत असल्याने नवी तंत्रे आणि औषधं बाजारात येत आहेत. त्यामुळे आजारांवर मात करणं सोपं होत आहे.  इतकंच काय तर नको असलेली गर्भधारणाही रोखू शकता. औषधं आणि गर्भपाताच्या मदतीने गर्भधारणा रोखली जाऊ शकते. मात्र अनेक देशात गर्भपातावर बंदी आहे आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये परवानगी दिली जाते. अशा परिस्थितीत लोकांसमोर गर्भनिरोधकाचा पर्याय उरतो. या पर्यायाचा मोठ्या संख्येने लोकं वापर करतात, परंतु जगात असा एक देश आहे जिथे गर्भनिरोधकांशी संबंधित वस्तूंची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाईचे कारण


आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्या देशाचे नाव व्हेनेझुएला आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशात कोणत्याही परिस्थितीत गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. तुरुंगात जाणे आणि गर्भपाताची परिस्थिती टाळण्यासाठी, लोक आधीच सावध राहून काळजीपूर्वक संबंध ठेवतात. अशा परिस्थितीत येथे गर्भनिरोधकाशी संबंधित वस्तू महाग होत आहेत.


कंडोम 60 हजार रुपयांना


मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर गर्भनिरोधक उत्पादनांच्या तुलनेत येथे गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी जास्त आहे. या देशात कंडोमच्या एका पॅकेटची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कंडोम इतका महाग असूनही लोक खरेदी करतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत 5-7 हजार रुपये आहे. याशिवाय इतर उत्पादनेही खूप महाग आहेत. काळ्या बाजारात तर त्याची किमत अधिक होते.