सारकस : भारतात महागाईवरुन नेहमीच हल्लाबोल सुरु असतो मात्र व्हेनेझुएलामध्ये एक बाटली दुधासाठी लोकांना तब्बल ८४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे महागाई इतक्या प्रचंड प्रमाणात वाढलीये की लोकांना महिन्याभराचे सामान विकत घेण्यासाठी पिशवीभरुन नोटा खर्च कराव्या लागत आहेत. महागाईमुळे येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होत चाललीये. या महागाईने तर गरीबांचा कणाच मोडलाय.


दुधाच्या एका पिशवीची किंमत ८४ हजार रुपये 


वेनेझुएलच्या केंद्रीय बँकेत आता केवळ १० अब्ज डॉलर रुपये राहिलेत. कर्जाची रक्कम फेडण्यातच बँकेचा पैसा संपलाय. जुने कर्जही ते चुकते करु शकलेले नाहीयेत. रशिया, चीन आणि जपान देशांचे कर्ज त्यांच्यावर आहे. अति महागाईमुळे व्हेनेझुएलाची करन्सी बॉलिवरच्या किंमतीत मोठी घसरण झालीये. येथे एका डॉलरची किंमत ८४००० बॉलिवर झालीये.


४००० टक्क्यांनी वाढली महागाई


भारतात जेथे ३ टक्क्यांनी महागाई वाढली तर हंगामा होतो. व्हेनेझुएलामध्ये तर तब्बल ४००० टक्क्यांनी महाहाई वाढलीये. सीएनएनच्या बातमीनुसार, महागाई प्रचंड वाढल्याने येथील लोकांचे मोठे हाल होतायत. दुकांनांमध्ये रोजच्या गरजेच्या वस्तू मिळत नाहीयेत. तर महिन्याचे रेशन भरण्यासाठी लाखो बॉलिवरची गरज पडतेय.


एका आठवड्यासाठी ७ लाख रुपये


महागाईचा मोठा फटका गरीब वर्गातील लोकांना बसतोय. त्यांना मिळणाऱ्या २.२ लाख बॉलिवर इतक्या पगारात ते महिन्याभराचे सामानही भरु शकत नाहीयेत. एका आठवड्याच्या सामानासाठी ७ लाख ७२ हजाराहून अधिक बॉलिवर खर्च करावे लागत असल्याने गरीब वर्गातील लोक महागाईने होरपळून निघतायत. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेय.


एक डझन अंड्यांची किंमत १२ हजार रुपये 


रोजच्या जगण्यातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने लोकांचे जगणे कठीण झालेय. महागाईमुळे मात्र काळा बाजार प्रचंड प्रमाणात वाढलाय. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते रोजच्या वस्तू खरेदी करु शकत आहेत. लॉस एंजेलिस टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, येथील ब्लॅक मार्केटमध्ये एक डझन अंड्यांची किंमत १५० डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांनुसार ही किंमत साधारण  १२ हजार रुपये इतकी आहे. याचप्रमाणे एक किलो पिठासाठी येथील लोकांना तब्बल ९.५० डॉलर(६१७ रुपये) मोजावे लागत आहेत.