gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे. या बातमीनं हॉलिवूड विश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. सेक्स सिम्बॉल (Sex Symbol) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीनं मार्लिन मन्रो (Marylin Monreo) यांनाही टक्कर दिली होती. त्याचसोबत या अभिनेत्रीचा जीवनप्रवासही फार जास्त संघर्षमय राहिला आहे. जीना लोलोब्रिगिडा या एक इटालियन अभिनेत्री होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या त्याचसोबत नव्या उमेदीनं विस्कटलेल्या आयुष्यातूनही भरारी घेणाऱ्या जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन हे हॉलिवूडला धक्का देणारं ठरलं आहे. काही महिन्यांपुर्वी मांडीचे हाडं मोडलं होतं. तेव्हा त्यांची शस्त्रक्रियाही झाली होती त्या चालायलाही लागल्या होत्या परंतु दुर्दैवानं त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना तीन बहिणी आहेत. (veteran hollywood actress sex symbol gina lollobrigida dies at the age of 95) 


त्यांच्या जन्म 4 जूलै 1927 रोजी झाला. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटातून काम केलं आहे. अभिनयासोबतच त्या एक फोटोजर्नलिस्टही होत्या, त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. त्यांचे टोपणनावं 'लोलो' असे होते. आजकाल बॉलिवूडच्या करिश्मा कपूरला आपण 'लोलो' (Lolo) असं म्हणतो परंतु जीना यांना 'लोलो' असं म्हटलं जातं. 1953 साली त्यांनी बीट दे देविल (Beat the Devil) आणि 1956 साली त्यांनी द हचबॅक ऑफ नोट्रे डॅम या चित्रपटांतून काम केले होते. या दोन चित्रपटांनी त्यांना चांगली प्रसिद्धी मिळवून दिली होती. 



हेही वाचा - Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर


कोण होत्या जीना ? 


त्यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी गोल्डन ग्लोब या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. 'ब्लॅक ईगल', 'कम सप्टेंबर', 'ट्रेपीज',  'अलार्म बेल्स', 'बीट द डेविल', 'बुओना सेरा' आणि 'मॅड अबाउट ओपेरा' अशा काही चित्रपटांमधून त्यांनी लक्षवेधी भुमिका बजावल्या होत्या. त्यांची ओळख ही जगातिक सगळ्यांत सुंदर महिला अशी झाली होती. त्यांच्या निधनानं शोक व्यक्त करण्यात आला असून गोल्डन ग्लोबनं त्यांच्या ट्विटरवरूनही त्यांच्या निधनाची माहिती शेअर केली आहे.