Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

Richest 1% owns India's 40.5% of Wealth, Oxfam Report: जागतिक अर्थव्यवस्थेत कायम गरीब (Poor and Rich in India Report) हा अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जातो असे स्वरूप पाहायला मिळते. 

Updated: Jan 17, 2023, 12:18 PM IST
Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर title=

Richest 1% owns India's 40.5% of Wealth, Oxfam Report: जागतिक अर्थव्यवस्थेत कायम गरीब (Poor and Rich in India Report) हा अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जातो असे स्वरूप पाहायला मिळते. मध्यमवर्गीय (Middle Class India's wealth) मात्र यात मधल्या मध्ये भरडला जातो. हा श्रीमंत वर्ग असं काय करतो ही त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि हा गरीब वर्ग असं काय करत नाही की त्यांच्याकडून आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही. या जर तरच्या गोष्टी असल्या तरी जागतिक पातळीवर मात्र सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळतं आहे. भारतातही सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी (Indian Richest Persons) दिवसागणिक वाढत जाते आहे. शेअर मार्केट आणि जागतिकीकरणाचा फायदा या श्रीमंत व्यक्तींना प्रामुख्यानं होतं असल्याचं कळतं आहे. त्यातून येत्या काही दिवसांत श्रीमंत भारतीयांच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता आहे. आज या श्रीमंत व्यक्तींना आशियाच नाही तर जगातही मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. (Richest 1% owns India's 40.5% of Wealth say Oxfam Report news in marathi)

सध्या डेवोस, स्विझर्लेंड येथे वर्ल्ड एकोनॉमिक फोरमचे (World Economic Forum) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या परदेशी गुंतवणूकीबाबत (Foreign Investment) जगाशी संवाद साधणार आहेत. या फोरमच्या आधी ऑक्सफेम (Oxfam) या जगप्रसिद्ध संस्थेनं एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ज्यातून 1% श्रीमंत व्यक्तीकडे भारताची 40.5% टक्के संपत्ती असल्याचे या रिपोर्टमधून समोर आले आहे. आपल्या भारताचा जीडीपी (GDP) हा वाढण्याचे संकेत काही अर्थतज्ञ देत आहेत. त्यातून आपल्या देशाचे वार्षिक उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. त्यातून या श्रीमंत व्यक्तींचेही उत्पन्न आणि संपत्ती (India's Wealth) समातंररीत्या वाढू लागली आहे. 

ऑक्सफेममधून काय समोर आलं? 

आशिया खंडातून श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असणारे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनाही मागे टाकून चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. 2022 साली त्यांच्या संपत्तीत 46% वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या ऑक्सफेमच्या रिपोर्टनूसार, 2022 वर्षात भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा आकाडा 106 वरून 122 वर गेला आहे. यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे देशातील गरीब जनता ही मुलभूत गरजाही पुर्ण करू शकत नाही आहेत. 

यातून पुन्हा एकदा श्रीमंतावर टॅक्स लावला गेला पाहिजे, याची मागणी पुढे एकदा होऊ शकते. या टॅक्समधून (Tax on Billionaires) देशातील अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न सुटू शकतात, अशी चर्चा आता जोर धरते आहे.