हायवेवरील गाड्यांवर आदळलं विमान! 10 जणांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम Video त कैद
Video Malaysia Plane Crashed On Highway: एक खासगी विमान राजधानीमधील विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताच हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची दृष्य अनेक कार्सच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली असून अपघात पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
Video Malaysia Plane Crashed On Highway: मलेशियामधील सेलांगोरमध्ये गुरुवारी (17 ऑगस्ट रोजी) एक भीषण विमान अपघात झाला. एक खासगी जेट विमान चक्क हायवेवरी धावत्या गाड्यांदरम्यान कोसळलं. हा धक्कादायक अपघात कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियामधील नागरिक उड्डयन प्राधिकरणानेच यासंदर्भातील माहिती दिली आहे. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपघातग्रस्त विमानातील 8 जण आणि अन्य 2 नागरिक मरण पावले आहेत.
नक्की घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये जळून खाक झालेल्या विमानातून 8 प्रवासी प्रवास करत होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे. तर विमान अत्यंत वेगाने हायवेवर कोसळल्याने हायवेवरील दोघांचा आगीच्या ज्वालांमुळे मृत्यू झाला आहे. नागरिक उड्डयन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये 2 पायलेट आणि 6 प्रवासी होते. हे विमान सेलांगोर राज्यातील सुल्तान अब्दुल अझीज शाह विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अचानक या विमानाचा अपघात झाला. नागरिक उड्डयन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान हायवेवर जाणाऱ्या एका कारला धडकलं.
या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पाहूयात यापैकी काही व्हिडीओ...
1) डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झाला अपघात
2) स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता झाला अपघात
3) अपघात झाल्याचा क्षण
एका आमदाराचाही मृत्यू
नागरिक उड्डयन प्राधिकरणाचे प्रमुख नोरजमान महमूद यांनी विमानाने लैंगकावी येथील एका बेटावरुन उढ्डाण केलं होतं. राजधानी कुआलालंपूरच्या पश्चिमेला असलेल्या सुल्तान अब्दुल अझीज शाह विमानतळाच्या दिशेने हे विमान जात होते. 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमान अपघातामध्ये मरण पावलेल्यांमध्ये पाहंगचे आमदारही होते आणि एका विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते. या अपघातानंतर मलेशियाचे राजा, सुल्तान अब्दुल्ला अङमद शाह यांनी दुर्घटनास्थळाचा दौरा केला. तसेच मलेशियामध्ये परिवहन मंत्री अँथनी लोके यांनी ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून तपास केला जाईल असं म्हटलं.