मुंबई : दक्षिण कॅलिफोर्नियामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका 17 वर्षांच्या मुलीने आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी भल्या मोठ्या अस्वलाशी दोन हात केले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर झालं असं की, 17 वर्षीय मुलीच्या घरातील पाळवी कुत्रे आणि अस्वल यांच्यात वाद झाला आहे. मोठमोठ्याने भुंकताना कुत्रे अस्वलाच्या पिल्लांना घालवत होते. पण अस्वलाची पिल्ल काही जात नव्हती. मोठ्याने आवाज ऐकू यायला लागल्यावर तरूणी धावत बाहेर आली. 



पाहते तर तिचे पाळीव 3 कुत्रे अस्वलाच्या पिल्लांवर भुंकत होते. मुलीने हा प्रकार पाहताच महत्वाची भूमिका साकारली. तरूणीने भिंतीवर चढलेल्या भल्या मोठ्या हत्तीला चक्क ढकलून दिलं आणि तेथून आपल्या कुत्र्यांना घेत पळ काढला. 


दिलेल्या एका मुलाखतीत तरूणी सांगते की,'जोपर्यंत मी त्या प्राण्याला धक्का दिला नव्हता. तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की, ती एक अस्वल आहे. म्हणजे माझ्या डोक्यातही आलं नाही की ते अस्वल असेल. मला तेव्हा एवढीच भीती होती की, तो प्राणी माझ्या कुत्र्यांना घेऊन जाईल. मी त्या पिल्लांना वाचवण्यासाठी अस्वलाला धक्का दिला.'


21 सेकंदाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर धम्माल उडवली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओने 8 लाखून अधिक व्ह्यूज मिळवले असून 2 लाख 17 हजाराहून अधिक लाइक्स आहेत.