रूस: अनेक ठिकाणी गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडिकेटरचा वापर केला जातो. गाडी वेगानं चालवण्याचा जसा एक जोश असतो तसाच बाहेर राहून किंवा तेवढ्या वेगात गाडीच्या टपावरून हा जोश अनुभवता आला तर? आतापर्यंत तुम्ही ट्रक किंवा sunroof कारने असा प्रवास अनुभवला असेल. पण चक्क कारच्या बाहेरून हा प्रवास एका तरुण अनुभवत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूसी इन्फ्लुएंसरने कारसोबत एक भयंकर स्टंट केला आहे. हा स्टंट पाहून तुम्हीही बोटं तोंडात घालाल. त्याचा हा स्टंट त्याच्या जीवावरही बेतू शकला असता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.


रूसी इन्फ्लुएंसर डेनिल मायसनिकोव याचा हा भयंकर स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर 180 किमी प्रति वेगानं गाडी पळत आहे. या गाडीत नाही तर गाडीच्य़ा बाहेर गाडीवर झोपल्याचं दिसत आहे. त्याने यासाठी टेप आणि दोरी घेतली. या दोन्ही गोष्टींनी त्याने आपलं शरीर पूर्णपणे गाडीला बांधून टाकलं. त्यानंतर ही गाडी चालवण्यात आली. 



इंन्स्टाग्रामवर त्याचे 8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामागे पोलिसांचा ससेमीरा सुरू झाला आहे. हा व्हि़डीओ पोलिसांकडे पोहोचला असून आता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.