Video Woman Running Behind Flight: तुम्ही अनेकदा बस किंवा एसटीला हात दाखवून थांबवत ती पकडली असेल. अगदी शेवटच्या क्षणी गाडी सुटण्याआधी स्टेशनवर पोहचलेल्या प्रत्येकाने आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. मात्र असं विमानासंदर्भात होणं तसं कठीणच पण असा प्रकार नुकताच समोर आला असून या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामध्ये ऑस्ट्रेलियातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. 


व्हिडीओ आला समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या विमानाने या महिलेने प्रवास करणं अपेक्षित होतं त्यामध्ये बोर्डिंग करणं तिला जमलं नाही. त्यानंतर ही महिला थेट रनवेवर धावत गेली आणि तिने चक्क विमान थांबवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा संपूर्ण प्रकार ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विमानतळावर घडला. ही महिला सुरक्षेची साखळी तोडून थेट विमानाजवळ पोहोचली. तिने विमानाच्या पायलटला हात दाखवून विमान थांबवण्याचा इशारा केला. पायलटही विमानामधून खाली पाहत ही महिला विमानाच्या चाकाजवळ काय करतेय असा प्रश्न पडल्याने तो गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होता. हा संपूर्ण प्रकार अॅडलेडला जाणाऱ्या क्वांटासलिंकच्या विमानामध्ये बसण्यासाठी या महिलेने केला. हा प्रकार वेटिंग एरियामधील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला विमानाच्या चाकाजवळ चालत पायलटशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 


विमानाचा पाठलाग केला


या महिलेला अटक करण्यात आली असून तिला जामीन देण्यास नकार दिला आहे. या महिलेला लवकरच कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. "एका महिलेचं विमान सुटल्याने तिने थेट विमानतळावरील रन वेवर धाव घेतली आणि तिने क्वांटासलिंक एम्ब्रेयर ई 190 एआर विमानामागे (व्हीएच-एक्सव्हीओ) धावत होती. धावत विमान पकडण्याचा प्रयत्न तिने केला. ही विचित्र घटना 1 नोव्हेंबर रोजी 2023 कॅनबेरा विमानतळावर घडला. विमानाचा पाठलाग करताना या महिलेने पायलटला हातवारे करण्यास सुरुवात केली. या महिलेला जामीन नाकारण्यात आला आहे," अशी कॅप्शन या व्हिडीओ देण्यात आली आहे. 



आता तिचं उड्डाण कायमच लॅण्डेड


काही तासांमध्ये या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकाने ही बाई इथं पोहोचलीच कशी असा प्रश्न विचारला आहे. तर अन्य एकाने आता हिला कधीच विमानाने प्रवास करता येणार नाही, असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी 'वो स्त्री है कुछ भी कर सकती है' अशा अर्थाने प्रतिक्रिया नोंदवल्यात.