खरोखर अप्रतिम...! 27 कोटी रुपयांची Lamborghini कार फक्त लाकडापासून...
लाकडाचे काम करणाऱ्या ट्रोंग वॅन डाओने आपल्या मुलासाठी ही लाकडाची कार बनवली.
वियतनाम (हानोई ) : जगातील सगळ्यात महाग कारपैकी Lamborghini कार ही एक आहे. ही कार खूप महाग तर आहेच, परंतु त्याचे उत्पादन कमी होते असल्याने जगातील खूप कमी लोकांकडे ही कार आहे. असे असले तरी, काही कार प्रेमींना एकदातरी या कारमध्ये बसण्याची किंवा ही कार चालवण्याची इच्छा असतेच. काही कार प्रेमी इतके वेडे असतात की, ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात.
अशाच एका कार प्रेमीने Lamborghini कार बनवली, तिही लाकडाची. त्याने फक्त शोसाठी ही कार बनवली नाही, तर ही करा रस्त्यावर धावते सुद्धा, तेही ताशी 25 किलेमीटर वेगाने.
वियतनाममधील लाकडाचे काम करणाऱ्या ट्रोंग वॅन डाओ (Truong Van Dao) नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी ही लाकडाची इलेक्ट्रिक लेम्बोर्गिनी (Electric Lamborghini Car) बनवली. गेल्या आठवड्यात आपल्या फेसबुक अकाउंटवरुन ट्रोंग वॅन डाओ (Truong Van Dao) या कारसोबत त्याचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलाला रिमोट कंट्रेल देताने दिसत आहे.
ही Lamborghini कार Sian Roaster आहे. यूट्यूबवरील 'ND - Woodworking Art' चॅनलने ट्रोंग वॅन डाओच्या कारनाम्याचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये मिनी स्पोर्ट्स कार बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया या 15 मिनिटांच्या व्हीडिओमध्ये दाखवली गेली आहे. या कारचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोखो लोकांनी त्याला शेअर आणि कमेंट्स केल्या आहेत. लोकं ट्रोंग वॅन डाओच्या कामाचे खूप कौतुक करत आहेत.
ट्रोंग वॅन डाओ (Truong Van Dao) ने ही कार 65 दिवसांत तयार केली आहे. व्हीडिओच्या वर्णनात त्यांने असे लिहिले आहे की, या सुपरकारामध्ये सुपरकॅपेसिटर आहे. ही कार वाया गेलेल्या आणि पडिक लाकडापासून बनवली गेली आहे. या कारमध्ये बसवल्या गेलेल्या मोटरीमुळे, ही कार ताशी 25 किलोमीटर वेगाने धावू शकते.