मुंबई : व्हिएतनाम येथे एक १४ वर्षीय मुलगी मोबाईल चार्जरचा शॉक लागल्याने दगावल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ला थाई झिऑन नावाची १४ वर्षीय मुलगी आयफोन ६ वापरत होती.  मृतावस्थेतील ला थाईच्या बाजूला आयफोन फोनला जोडलेला चार्जर सापडला आहे. तसेच तिचया बेडवर काळा डाग पडला आहे. 


तपासयंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,  चार्जरवरील रबर निघाले होते. त्यावर एक ट्रान्सपरंट टेप जोडली होती. या मुलीला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र बेशुद्ध अवस्थेत असणार्‍या या मुलीला मृत घोषित करण्यात आले आहे. 


इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. तसेच तिच्या फोनची कॅबल अ‍ॅपलची ओरिजनल कॅबल आहे का ? हे तपासून पहिले जाईल. मात्र अ‍ॅपलने अजूनही याबाबत कोणतीच माहिती दिली नाही.