हनोई : coronavirus update : जगभरातील देश कोरोनापासून (coronavirus) स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत आणि लोकांना सतत कोविड नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. आता व्हिएतनाममध्ये (Vietnam) एक प्रकरण समोर आले आहे जिथे एखाद्या व्यक्तीला कोविड प्रोटोकॉलचे पालन न केल्याबद्दल पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. ही व्यक्ती जाणूनबुजून त्याच्या परिचितांमध्ये कोरोना संसर्ग पसरवल्याबद्दल (spreading coronavirus) दोषी आढळली.


कोविड-19 नियमांचे पालन केले नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयटर्सच्या (Reuters) वृत्तानुसार, 28 वर्षीय ली व्हॅन ट्री (Le Van Tri) याच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला, त्यानंतर त्याला कोरोना नियमांचे पालन न (COVID-19 quarantine rules) करणे आणि संसर्ग पसरवण्यासाठी (spreading coronavirus) जबाबदार धरण्यात आले आहे. ली व्हॅन ट्री याच्यावर त्याच्या परिचितांना कोरोना संक्रमित करण्याचा तसेच विलगिकरण ठेवण्याच्या नियमांचे (quarantine rules) उल्लंघन केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आणखी दोन लोकांना 18 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


स्थानिक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, ली व्हॅन ट्री याला 21 दिवस अलग (quarantine) ठेवण्यात सांगितले गेले होते, परंतु नियमबाह्य होऊनही तो हो ची मिन्ह शहरात (Ho Chi Minh City) परतला. त्या व्यक्तीने होम मेडिकल क्वारंटाईन तोडले आणि येथून अनेक ठिकाणी प्रवास सुरू ठेवला. याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे 8 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 7 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला.


व्हिएतनाममध्ये कोरोनाचा कहर


गेल्या वर्षी व्हिएतनाममध्ये (Vietnam) कोरोनावर (COVID-19 outbreak) मात केल्यानंतर, या वर्षी प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या तेथे सुमारे 5.50 लाख संक्रमित रुग्ण आहेत आणि 13 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या अखेरीस, मृतांचा आकडा अचानक वाढला होता आणि राजधानी हनोईसह हो ची मिन्ह शहराला महिन्याभराच्या कठोर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी लागली.