VIRALमागचं सत्य : बिकिनीतले ते फोटो क्रोएशिया राष्ट्रपतींचे?
कोलिंडा अतिशय कमी वयात क्रोएशियाच्या राष्ट्रपती बनल्यात...
मुंबई : 'फिफा फुटबॉल वर्ल्डकप'चा जोरदार फिव्हर खेळाडुंमध्ये आणि चाहत्यांमध्ये दिसून येतोय. या वर्ल्डकपमध्ये रशियाला धोबीपछाड देत क्रोएशिया फायनलमध्ये पोहचला तेव्हा या युरोपीय देशाबद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली. त्यातच क्रोएशियाच्या राष्ट्रपती कोलिंडा ग्रबर - किटारोविकही इंटरनेटवर चर्चेत आल्या. सध्या राष्ट्रपती कोलिंडा यांचे काही बिकिनीतले फोटो असल्याचं सांगत काही पोस्ट वायरल झाल्यात. पण, बिकिनीतले हे फोटो खरंच कोलिंडा यांचे आहेत का? जाणून घेऊयात...
क्रोएशियानं रशियाविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर राष्ट्रपती कोलिंडा आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहचल्या... खेळाडूंची मोठ्या आनंदानं गळाभेट घेण्याचा त्यांचा व्हिडिओही वायरल झाला... यावेळी अनेक खेळाडुंनी आपली जर्सीही घातलेली नव्हती... म्हणूनही हा व्हिडिओ चघळला गेला.
त्यानंतर राष्ट्रपती कोलिंडा समुद्र किनाऱ्यावर बिकिनी घालून फिरत असल्याचं सांगत काही फोटो वायरल झाले.
परंतु, सत्य म्हणजे कोलिंडा यांचा बिकिनीतले फोटो म्हणून जे फोटो वायरल होत आहेत ते कोलिंडा यांचे फोटो नाहीत.... हे फोटो आहेत एक अमेरिकन ग्लॅमरस मॉडल कोको ऑस्टीनचे... कोको ऑस्टिनचा चेहरा बहुतांशी कोलिंडा यांच्यासारखाच दिसतो.
पण, कोकोचे फोटो कोलिंडा यांच्या नावानं खपवण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. २०१६ मध्येदेखील बिकिनीतले हे फोटो लोकांनी कोलिंडा यांचे फोटो आहेत म्हणत शेअर केले होते. इतकंच नाही तर एकदा पॉर्न स्टार डायमंड फॉक्स हिचा एक अर्धनग्न फोटोही कोलिंडा यांचा फोटो आहेत म्हणत इंटरनेटवर वायरल झाला होता. कोलिंडा यांनी एका अश्लील सिनेमात काम केल्याचंही सांगितलं जात होतं. परंतु, सत्य वेगळंच होतं... आणि ते उघडही झालं.
उल्लेखनीय म्हणजे, ५० वर्षीय कोलिंडा ग्रबर - किटारोविक अतिशय कमी वयात क्रोएशियाच्या राष्ट्रपती बनल्यात. इतकंच नाही तर या पदापर्यंत पोहचणाऱ्या त्या एकमेव आणि पहिल्या महिला ठरल्यात. राष्ट्रपती बनण्यापूर्वी त्यांनी क्रोएशियाच्या परदेश मंत्री म्हणूनही काम केलंय.