viral video - वडील आणि मुलीचं नातं खूप खास असतं. त्यांचा एकमेकांमध्ये जीव अडकलेला असतो. मुलगी जेव्हा लग्नासाठी नवरा शोधते तेव्हा ती नवऱ्यामध्येही आपल्या वडिलांची छबी शोधते. तर वडील आपल्या मुलीसाठी खूप प्रोटेक्टिव असतात. तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कायम तत्पर असतात. तर मुलगी वडिलांच्या इच्छेसाठी काहीही पण करते. एका मुलीसोबत असाच काहीसा प्रसंग उभा राहिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या मुलीला वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती. तिने वडिलांची ही इच्छा पूर्ण केली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही.


काय होती वडिलांची इच्छा?


त्या मुलीच्या वडिलांना गंभीर आजार असतो आणि ते हॉस्पिटलमध्ये शेवटचे क्षण मोजत असतात. अशा परिस्थित वडिलाने मुलीजवळ आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी अशी काही इच्छा बोलवून दाखवली की, मुलीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.


वडिलांची इच्छा होती की, त्यांना रम प्यायची होती. हॉस्पिटलमध्ये वडिलांची ही इच्छा कशी पूर्ण करणार हा प्रश्न या मुलीसमोर उभा राहिला. पण वडिलांची शेवटची इच्छा मग काय, अशावेळी मुलगी ती कशी पूर्ण करणार नाही. या मुलीनेही आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढली.



बेटी हो तो ऐसी


मुलीचं नाव पेनोलोप अन आहे. तिच्या वडिलांना रम खूप आवडत असते. मग काय या मुलीने हॉस्पिटलमध्ये आपल्या वडिलांना त्यांची आवडती रम प्यायला दिली. आता तुम्ही विचार कराल की हॉस्पिटलमध्ये हे कसं शक्य झालं. इच्छा असेल तर आपण काहीही करु शकतो, या वाक्याचा इथे प्रयत्य येतो. मुलीने Bundaberg Rum ही रम आपल्या वडिलांना इंजेक्शनमधून प्यायला दिली.



इच्छा पूर्ण होतातच घेतला अखेरचा श्वास


हा व्हिडीओ पाहून भावूक व्हायला होतं. वडिलांचं आणि मुलीचं नातं हे कधीही शब्दात सांगता येणार नाही. पण हा व्हिडीओ पाहून वडील आणि मुलीचं नातं कसं असतं ते समजू शकतो. मुलीने रम दिल्यानंतर काही वेळात त्या भाग्यवान वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. हो, मुलीने इच्छा पूर्ण करताच त्यांनी जगाचा निरोप घेतला.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांचं या व्हिडीओने मन जिंकलं आहे.