रशिया :  जगभरात प्रत्येक क्षणाला काहीनाकाही अजब गजब प्रकार घडत असतात. पश्चिम रशियातील साखलिन (Sakhalin) येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाऴ्यात जवळपास १,१०० किलो इतक्या वजनाचा Sunfish या जातीचा मासा सापडला. या माशाला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. आता या माशाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एवढा मोठा मासा असू शकतो हे आज आम्हाला कळले असे तिथल्या स्थानिकांचे मत होते. डॉल्फीन माशांचा आकार सर्वसाधारणपणे १.५ मीटरपर्यंत असतो. त्यामुळे या माशाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.