Couple Remarried: एका लग्नाची दुसरी गोष्ट, याचा प्रत्यय खऱ्या जीवनात पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात एक अनोखी प्रेमकहाणी चर्चेत असून सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. 2004 मध्ये एका जोडप्याचे लग्न झाले. 2015 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला पण एका ई-मेलमुळे त्यांचे 2019 मध्ये पुन्हा लग्न झाले. ही कथा डॅनियल कर्टिस आणि टिम कर्टिस यांची आहे. या दोघांना एकत्र आणण्यात एका ई-मेलने महत्त्वाची भूमिका बजावली. 


काय आहे त्यांची लव्ह स्टोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, 2015च्या घटस्फोटानंतर, डॅनियल आणि टिम दोन वर्षे एकमेकांपासून दूर होते. ते साधे कधी एकमेकांशी बोलले नाहीत. मात्र 2017 मध्ये तिने ई-मेल पाठवला. यामध्ये, तिने तिच्या माजी पतीचे कौतुक केले की, त्याने मुलांच्या संगोपनात तिला साथ दिली. यानंतर दोघांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2019 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केले.


'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस हिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे तिच्या होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिमने तिला प्रपोज केले. तिने सांगितले की, 'पहिल्या डेटनंतर बरोब्बर दोन वर्षांनी आम्ही जानेवारी 2004 मध्ये लग्न केले. 18 महिन्यांनंतर, टीम याने अधिकृतपणे त्यांचे मूल देखील दत्तक घेतले.


2015 मध्ये घटस्फोट झाला आणि...


2012मध्ये जागतिक आर्थिक संकटाचाही या जोडप्याला मोठा फटका बसला. यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पुनर्विवाह करताना, तिने एका ऑनलाइन वृत्तपत्राला सांगितले की, 2017 मध्ये एका समुपदेशकाच्या मदतीने तिला जाणवले की आपल्या जिवनात शांतता आणि आनंद पाहिजे. जर तिला तो हवा असेल तर तिला टिम आणि स्वतःला माफ करावे लागेल. म्हणून तिने ई-मेल लिहिला. ती त्याला म्हणाली, 'माझे लग्न मोडण्याची मी जबाबदारी घेतली आणि टीमला सांगितले की मुलांचे संगोपन करण्यात तो खूप मदत करतो. 6 महिन्यांनंतर उत्तर पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांने उत्तरात लिहिले की, 'आपण एकत्र चर्चा का करत नाही.' याच धाग्याने त्यांना पुन्हा विवाह बंधनात बांधले.