Husband Wife Trending news : आयुष्य कधी कुठलं वळण घेईल याचा काही नेम नाही. असं म्हणतात की नवरा बायकोची जोडी ही स्वर्गात जोडली जाते. पृथ्वीवर आपण फक्त भेटतो आणि आपलं नातं जोडल्या जातं. आपल्या आजूबाजूला आपण अनेक वेळा पाहिलं आहे. प्रेम कोणासोबत आणि लग्न दुसऱ्या सोबत होतं. तेव्हा म्हणतात की, तुझा या जन्मात हाच जोडीदार ठरला होता. विवाह संस्थेत लग्न करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. कुटुंबात काही नाती अशी असतात ज्यात प्रेम किंवा लग्न होऊ शकतं नाही. मामी भाचा, काका पुतणी, बहीण भाऊ इत्यादी...ही नाती अतिशय पवित्र मानली जातात. त्यात प्रेम असतं पण मायेच...त्यात नवरा बायकोचं नात होऊ शकतं नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रेम आणि लग्नबद्दलची संकल्पना बदलताना दिसत आहे. सोशल मीडियावर अशी एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात 17 वर्षांची ओळख, 10 वर्षांचं लग्न आणि तीन मुलांनंतर नवरा बायकोला कळलं ही आपण बहीण भाऊ आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील कोलोरॅडोमधील ही विचित्र आणि धक्कादायक घटना आहे. वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्यात अचानक वादळ आलं. सेलिना आणि जोसेफ यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली तर ते 17 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या सुखी संसारात तीन फुलं म्हणजे त्यांची मुलं होती. आनंद आणि प्रेमाने परिपूर्ण या कुटुंबात त्या एका गोष्टीमुळे होत्याच नव्हतं झालं. त्या नवऱ्या बायकोच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 


झालं असं की, अचानक सेलिनाने तिची आणि तिच्या पतीची डीएनए टेस्ट करायचं ठरवलं. पण डीएनए रिपोर्ट पाहिल्यावर पायाखालची जमीन सरकेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना या रिपोर्टनंतर कळलं की जोसेफ हा सेलिनाचा चुलत भाऊ होता. 


सेलिनाने तिच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय. ही बातमी त्यांच्यासाठी 'एक अच्छी आइस ब्रेकर' सारखी होती. त्यांनी इतर जोडप्यांना स्वतःचं कुटुंब वृक्ष तपासण्याचा सल्ला दिला. यांची या विचित्र घटना सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओवर, नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी घटस्फोट घ्यावे असा सल्ला दिलाय. 


हेसुद्धा वाचा - मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...


सेलिनाने तिचा नवरा प्रत्यक्षात तिचा चुलत भाऊ आहे  हे तिला पहिल्यांदा कळले तो क्षण अतिशय धक्कादायक होता. पण हे सत्य कळल्यानंतर आमचं प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालं असे ते म्हणतात. त्यामुळे नेटकऱ्यांचा घटस्फोटाच्या सल्लाकडे त्या दोघांनी लक्ष दिलं नाही किंवा त्याचा कधी विचारही केला नाही. 


पुढे म्हणाले की, आम्हाला तीन मुलं आहे आणि मला कळलं की आम्ही भाऊ आणि बहीण आहोत. 2016 मध्ये माझी डीएनए चाचणी झाली आणि त्याचा परिणाम चिंताजनक होता. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, 'बेबी आपण भाऊ बहीण आहोत, आपण एकत्र राहणार आहोत का? हे विचित्र आहे.' मला खरोखर खूप भीती वाटली. पण आम्ही ठरवलं की आपण जगासाठी आपलं नातं आणि आपलं लग्न मोडणार नाही.