Viral News : भिंतीमध्ये सापडली 132 वर्षं जुनी रहस्यमयी चिठ्ठी; लाइटहाऊसचे सर्वात मोठं रहस्य उघड
Viral News : समुद्र किनाऱ्यावरील दीपगृहाच्या भिंतीच्या आत एका काचेच्या बाटलीत 132 वर्षे जुनं पत्र सापडलं. जे वाचून इंजिनियरला धक्का बसलाय. त्यात अनेक नावांसह खजिनाबद्दल...
Viral News : पुरातन काळातील अनेक स्थळांवर त्यांच्या जतन करण्यासाठी आणि पुरातन विभागाकडून त्या स्थळांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्खननाची काम हाती घेतली जातात. या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा असे रहस्य समोर येतात, जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. एवढंच नाही, या खोदकामात अनेक वेळा जुनी नाण्यासह नकाशे, खजिनाही गवसतो. अशाच एका समुद्र किनारी असलेल्या ऐतिहासिक दीपगृहाचे नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. अहोरात्र तिथे इंजिनियर काम करत होते. अशात या दीपगृहाच्या भिंतीमध्ये एक इवलिशी काचीची बाटली सापडते. त्या बाटलीमध्ये एक छोटीशी चिठ्ठी होती, ज्यातून 132 वर्षं जुनं रहस्य समोर आलंय. हे पत्र वाचून तिथे काम करणाऱ्या इंजिनियरला धक्का बसलाय.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, स्कॉटलंडमध्ये 36 वर्षीय अभियंता रॉस रसेल यांनी बीबीसीला या रहस्यमय चिठ्ठीबद्दल सांगितलंय. रसेल आणि त्याची टीम किर्ककलममधील कॉर्नवॉल लाइटहाऊसच्या नूतनीकरणावर काम करत होती. हे लाईट हाऊस 1817 मध्ये बांधण्यात आलं होतं. इथे काम करत असताना त्यांना दीपगृहाच्या भिंतीमध्ये एक बाटली सापडली.
त्यांनी ही चिठ्ठी दीपगृहाचा मालकाला दिली तर त्याने त्यात खजिन्याचा नकाशा आहे, असं सांगितलं. पण ही चिठ्ठी 1892 मध्ये दीपगृह बांधणाऱ्या अभियंता किपर्सनी क्विल इंकने लिहिलली होती. त्या काळात अभियंता या दीपगृहातील कॉर्नवॉल पोस्टच्या वरच्या बाजूला एक नवीन फ्रेस्नेल लेन्स स्थापित करत होते, जो एक प्रकारचा प्रकाश प्रदान करणारा कंदील होता. हे तेच उपकरण होते ज्यावर नूतनीकरणात काम सुरु होतं.
सप्टेंबर 1892 मधील या पत्रात असं लिहिलं होतं की, हा कंदील इंजिनियर जेम्स वेल्स, जॉन वेस्टवुड मिलराइट, इंजिनियर जेम्स ब्रॉडी, डेव्हिड स्कॉट लेबरर, जेम्स मिल्ने अँड सन इंजिनियर्स, मिल्टन हाउस वर्क्स, एडिनबर्ग यांच्या फर्मने तयार केला होता. मे ते सप्टेंबर महिन्यात याचं काम झालं. गुरुवारी रात्री, 15 सप्टेंबर 1892 रोजी हा दीपगृह तयार झाला.
पुढे पत्रात असं लिहिलंय की, 'यावेळी स्टेशनवर खालील रखवालदार होते, जॉन विल्सन प्रिन्सिपल, जॉन बी. हेंडरसन फर्स्ट असिस्टंट, जॉन लॉकहार्ट सेकंड असिस्टंट.' तर लेन्स आणि मशीन जेम्स डोव्ह अँड कंपनी इंजिनियर्स ग्रीनसाइड एडिनबर्ग यांनी पुरवले होते. त्या फर्मचे अभियंते विल्यम बर्नेस, जॉन हॅरोवर, जेम्स डॉड्स यांनी तो स्थापित केला होता.
एक आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांच्या गटाने हे पत्र लिहिलं होतं, जे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण उन्हाळा लागला. त्यानंतर त्यांनी ही नोट एका जुन्या काचेच्या बाटलीत कॉर्कने भरली आणि मरीन नेव्हिगेशन स्टेशनच्या भिंतीच्या आत एका अंतरावर ठेवली. हे पत्र आजवर कुठे दिसत नव्हतं.
दीपगृहाच्या देखभालीमध्ये गुंतलेल्या टीमसाठी हे पत्र धक्कादायक होतं. हे पत्र फक्त त्याच्यासाठीच लिहिलंय असं त्यांना जाणवलं. पत्रात वर्णन केलेल्या उपकरणांवर काम करत असताना ही नोट सापडणे हा विचित्र योगायोग असल्याचं रसेल म्हणाला आहे.