फ्लेरिडा : जर एक दिवस तुम्हाला समजले की, तुमच्या बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये आहेत. तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला हे पाहून एका क्षणासाठी आनंद तर होईल, परंतु नंतर तुम्हाला भिती देखील वाटेल की, हे आले तरी कुठून? पण तुम्ही म्हणाल की, ही तर बोलण्याची गोष्ट आहे असं खरं कधी होतं का? इतकं नशीब कोणाचं? परंतु अशी गोष्टं एका व्यक्ती बरोबर खरीखूरी घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गेल्या शनिवारी लार्गो येथे ज्युलिया योनकोव्स्की (Julia Yonkowski) काही पैसे काढण्यासाठी एका स्थानिक चेस बँकेत गेली (Chase Bank),पण त्याआधी तिने तिचा अकाउंट बँलेंस चेक केला. त्यावेळी तिला धक्कादायक माहिती मिळाली.


कोट्यवधी डॉलर्स अचानक बँक खात्यात


एटीएममधून प्राप्त झालेल्या बँक पावतीनुसार ज्युलिया योनकोव्स्कीच्या खात्यात $999,985,855.94 म्हणजेच 7417 कोटींपेक्षा जास्त रुपये होते. तिला हे जाणून आश्चर्य वाटले की, तिच्या खात्यात इतके पैसे कुठून आले?


20 एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले


जूलिया फक्त 20 डॉलर्स काढण्यासाठी एटीएममध्ये गेली होती.  त्यावेळी 20 डॉलर काढण्यासाठी मशीनकडून त्यांना इशारा देण्यात आला की, तुम्हाला हे पैसे मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तिने अशा घोटाळ्यांविषयी ऐकले होते, ज्यामुळे तिने कोणताही व्यवहार केला नाही. जूलियाने सांगितले की, मला यासाठी भीती वाटली कारण हा सायबर क्राइमही असू शकतो.


नंतर बँकेने दिले उत्तर


जूलिया अब्जाधीश झाली आहे हे समजताच तिने चेस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन अनेक वेळा तपासणी केली. नंतर दोन दिवसानंतर, अब्ज डॉलर्सची ही अनोखी कथा चेस बँकेने बंद केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी WFLA या न्यूज वेबसाइटला माहिती दिली की, ज्युलियाचे बँक अकाउंट बॅलेंस आधीच निगेटीव्हमध्ये होतं. कोणत्याही बँक खात्यात संशयास्पद घटना घडल्यास अशा प्रकारचे नंबर्स वापरले जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.