Viral photo of Couple: आपल्यासोबत कधी काय घडू शकत याचा काही नेम नाही असंच काहीसं घडलं होतं एका कपलसोबत. या कपलला समोर आलेल्या संकटाचा पत्ताच नव्हता परंतु त्याचं नशीब बलव्वतर असल्यानं ते दोघंही त्या संकटातून सुखरूप वाचले. (viral news couple saves themself while taking selfie in the heavy thunder strom)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता पण आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की या कपलसोबत काय घडलं होतं ते. स्कॉटलंडच्या उत्तरेकडे वाइल्ड स्विमिंग टूरसाठी गेलेल्या सोफी पास (33) ने एक सेल्फी तिच्या जोडीदारासोबत शेअर केला जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 


स्कॉटलंडमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या सोफी पास आणि तिचा पती रिचर्ड यांच्यासोबत अंगावर काटा आणणारा हा धक्कादायक प्रकार घडला. दोघेही पावसाळ्यात स्कॉटलंडला गेले. या दरम्यान अचानक त्याच्या सेल्फीमध्ये काहीतरी रेकॉर्ड झालं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. तेव्हाच त्या दोघांच्या लक्षात आलं की काहीतरी त्यांच्यासोबत घडतं आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार सोफी आणि रिचर्ड सेल्फी घेत असताना पाऊस पडत होता. सेल्फी क्लिक करताना दोघांनाही जाणवले की काहीतरी आजूबाजूला घडतंय. सोफीच्या पतीच्या लक्षात आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे सोफीचे केस हवेत वरच्या दिशेने ओढले जाऊ लागले आहेत. रिचर्ड आणि सोफीला धोक्याचा इशारा मिळाला. त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला.



जेव्हा सोफी सेल्फी घेत होती तेव्हा रिचर्डच्या लक्षात आलं की सोफीचे केस वर ओढले जात आहेत. त्याने लगेच सोफीचा हात पकडून पळ काढला. ते पळून जात असताना मध्ये काहीच सेकंद गेली असतील नसतील आणि अचानक ज्या ठिकाणी त्यांनी सेल्फी घेतला त्या ठिकाणी जोरात वीज कोसळली. हा प्रकार पाहून ते दोघं घाबरले. 


हा प्रकार आपल्या आप्त आणि मित्रांसोबत शेअर करताना सोफीनं आणि रिचर्डनं अशावेळी आणि अशा ठिकाणी कुठेही सेल्फी घेताना सावध राहण्याचे आवाहन केलं आहे.