लंडन : लोक सुंदर दिसण्यासाठी काय काय करताता. लोकं त्यासाठी भयंकर सर्जरी करण्यापासून ते खूप जास्त पैसे खर्च करण्यापर्यंत खर्च करतात. परंतु काही वेळा हे त्यांच्यावर उलटतं. ब्राझीलच्या डक डी कॅक्सियस येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत जे घेडलं त्यासाठी तिला 13 दिवस रुग्णालयात राहावं लागले आणि शेवटी तिच्या अंगठ्याचा काही भाग कापून टाकावा लागला. असह्य वेदनांनी त्रस्त असलेल्या महिलेनं तिचा त्रास टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनिफर एक टिकटॉक स्टार आहे आणि तिचे या ऍपवर 76 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


जेनिफरने आपले हात सुंदर दिसण्यासाठी कृत्रिम नखं एक्‍सटेंशन (Nail Extension) केले होतं. जेणेकरून तिची नखं लांब आणि सुंदर दिसतील. पण हे नखं एक्‍सटेंशन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गमाने तिला आयुष्यभराची जखम दिली आहे. सुरुवातीला यामुळे तिच्या अंगठ्यात वेदना होऊ लागल्या, ज्याकडे तिने काही काळ दुर्लक्ष केले. यानंतर वेदना वाढल्या आणि तिचा अंगठा सुजला.


जेनिफर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिच्या अंगठ्याची स्थिती जाणून तिला धक्काच बसला.


अंगठा कापून घ्यावा लागला


मिरर यूकेच्या अहवालानुसार, डॉक्टरांनी जेनिफरला सांगितले की, तिला ग्लूमुळे इतका धोकादायक संसर्ग झाला आहे की, तिच्यावर बराच काळ उपचार केले जातील. यानंतर जेनिफरला रुग्णालयात दाखल करावे लागले.


तिच्यावर 3 शस्त्रक्रिया झाल्या आणि शेवटी तिच्या अंगठ्याचा पुढचा भाग कापावा लागला. जेनिफर म्हणते, 'मी खूप दु: खी आहे. तिचे नखं वाढवण्याच्या सवयीमुळे असे अशा प्रकारे तिला बोट गमावावा लागेल याची तिने कल्पनाही केली नव्हती.'