iPhone 12 Dropped : सध्या स्मार्टफोनचा (Smartphone) जमाना आहे. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. पण यातही iPhone वापरणं एक स्टेट्स मानलं जातं. पण आयफोन (iPhone) प्रत्येकालाच परवडतो असं नाही. त्याच्या किमतीमुळे तो सामानांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणूनच आयफोन वापरणारे त्याची काळजीही तितकीच घेतात. आयफोनसाठी ते काहीही करायला तयार असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
एका व्यक्तीच्या हातातून त्याचा आयफोन गटारात (Sewer) पडला. यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्यक्तीने मागचा-पुढचा विचार न करता कपडे काढत आयफोन मिळवण्यासाठी थेट गटारात उडी मारली. ही घटना ब्राझीलमधली आहे. हा व्यक्ती एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. कार्यक्रम सुरु असतानाच या व्यक्तीच्या हातातला मोबाईल जवळच असलेल्या गटारात पडला. 


गटार चिखलाने भरलेलं
आपल्या हातातला मोबाईल गटारात पडल्याचं कळताच त्याने आरडाओरडा सुरु केला. त्याचा आरडा-ओरडा ऐकून कार्यक्रमातील लोकं त्याच्या अवतीभोवती जमा झाली. आयफोन असून तो खूप महागडा असल्याचं सांगत त्याने लोकांना आपला फोन काढून देण्याची विनंती केली. पण लोकांनी चिखलाने भरलेल्या गटारात उतरण्यास नकार दिला. फोन काढून देणाऱ्याला पैसे देण्याचं त्याने आमिषही दाखवलं. पण यानंतरही कोणीही पुढे येईना. शेवटी त्या व्यक्तीने स्वत:चं गटारात उतरण्याचा निर्णय घेतला.


कपडे काढून गटारात उतरला
काहीही करुन आयफोन मिळवायचाच असा त्याने निश्चय केला होता. लोकांनी फोन काढून देण्यास नकार दिल्यानंतर स्वत:छं गटारात उतरण्याचा निर्णय त्याने घेतला. सर्वांसमोरच त्याने अंगावरचे कपडे काढले आणि गटारात उडी मारली. त्या व्यक्तीचं हे कृत्य पाहून लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये घटना कैद केली. ती व्यक्ती संपूर्णपण चिखलाने माखली होती. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. मोठ्या प्रयत्नानंतर अखेर फोन शोधण्यात त्याला यश आलं. 


ब्राझीलमध्ये आयफोन महाग
 अॅपलची (Apple) उत्पादनं जगभरात लोकप्रिय आहेत. विशेषतः आयफोनची (iPhone) अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयफोनची अनेक मॉडेल्स आहेत. सध्या iPhone 14 हे स्मार्टफोनमधील कंपनीचे सर्वात नवीन मॉडेल असून याला खूप मागणी आहे. आयफोनसाठी ब्राझील ही दुसरी सर्वात महागडी बाजारपेठ आहे. ब्राझीलमध्ये iPhone 14 ची किंमत 1,18,500 रुपयांपासून सुरु होते. इतर तीन मॉडेल्सची किंमत प्रत्येकी 1,34,000 रुपये, 1,48,000 रुपये आणि 1,63,500 रुपये आहे.