115 रुपयात किस, 11 रुपयात अलिंगन, `या` देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडचा अनोखा ट्रेंड...
Viral News : काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडतं. तरुणांची हेच विचार लक्षात घेऊन एक अनोखा ट्रेंड सुरु झाला आहे. काही देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडची संकल्पना रुजत असून याचा मेन्यू कार्डही बनवण्यात आला आहे.
Viral News : कधी कोणता ट्रेंड लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. सध्या काही देशात स्ट्रिट गर्लफ्रेंडचा (Street Girlfriend) ट्रेंड लोकप्रिय होतोय. काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडतं, अशा लोकांना डोळ्यासमोर ठेऊन ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. चीनमध्ये (China) सध्या हा अनोखा ट्रेंड चर्चेचा विषय ठरलाय. चीनमध्ये रस्त्याच्या कडेला काही तरुणी बसलेल्या दिसतात. त्यांच्यासमोर रेटकार्डही ठेवण्यात आलेली आहेत. या रेटकार्डमध्ये जोडीदाराबरोबर प्रेमाचे संवाद साधण्यापासून किसपर्यंतचे रेट्स देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ही सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईनही उपलब्ध आहे.
ज्या लोकांना प्रेमात धोका मिळाला आहे, किंवा कुटुंबात, नोकरीत समस्या आहेत, अशी लोकं आपल्या स्ट्रिट गर्लफ्रेंडसमोर मन मोकळं करु शकतात. पण त्यासाठी थोडे पैसे मोजावे लागतील. चीनमध्ये रेंटेड रिलेशनशिपची संकल्पना वाढली आहे. शेन्झेन सारख्या शहरांच्या रस्त्यांवर मुली रेट कार्ड घेऊन बसलेल्या दिसतात. यात चुंबन घेणे, अलिंगन देणं आणि एकत्र चित्रपट पाहणे यासारख्या सेवा या मुली देतात. या प्रेमाच्या क्षणांची किंमत 11 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार असे स्टॉल्स आता चीनमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. अशा अनेक स्टॉल्सचे फोटो आणि व्हिडिओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. काही तरुणी पैसे कमवण्यासाठी या मार्गाकडे वळताना दिसत आहे. पण या ट्रेंडमध्ये शारिरीक संबंधांस मनाई आहे. अलिंगन देण्याचे 11 रुपये, एका किससाठी 115 रुपये असे रेट ठरवण्यात आले आहेत.
याशिवाय एकत्र चित्रपट पाहण्यासाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्हाला जर तुमच्याबरोबर घरात काम करण्यासाठी जोडीदार हवा असेल तर त्यासाठीही या मुली तयार असतात. यासाठी 2000 रुपये किंमत आहे. या रेटकार्डमधील सर्वात महागडी सेवा म्हणजे एकत्र मद्यपान करणं. मद्यपान करण्यासाठी तुम्हाला महिला जोडीदार हवी असेल तर तुम्हाला 4100 रुपये द्यावे लागतील.
या अनोख्या ट्रेंडवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही या संकल्पनेचं कौतुक केलं आहे, तर तर काहींनी हा महिलांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.