US Francis Scott Key Bridge Collapse Video : जगभरात असणारे अनेक असे पूल आहेत जे कायमच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. अमेरिकेच्या मेरिलँड येथे असणारा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज हासुद्धा त्यातलाच एक. पुलाच्या भव्य आकारामुळं तो कायमच अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. अशा या महाकाय पुलाचा एक मोठा भाग अपघातामुळं कोसळला असून, या पुलाचं बरंच नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरिलँडमध्ये जहाजानं पुलाला धडक दिल्यामुळं एक प्रचंड अपघात झाला आणि पुलाचा बराच भाग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं पाण्यात कोसळला. अमेरिकेतील प्रमाण वेळेनुसार ही घटना रात्री दीड वाडम्याच्या सुमारास घडली. पुलाला धडक दिलेल्या जहाजानं घटनास्थळीच पेट घेतला आणि ते पाण्यात बुडालं. 


उपलब्ध माहितीनुसार सिंगापूरचा ध्वज असणारं हे जहाज श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबोच्या दिशेनं जात होतं. 22 एप्रिलला हे जहाज अपेक्षित स्थळी पोहोचणार होतं. पण, प्रवासाला निघालं असता पहिल्या तीस मिनिटांतच त्याचा भीषण अपघात झाला. अचानकच धडक लागल्यामुळं या पुलावर त्यावेळी असणाऱ्या कैक वाहनांनाही जलसमाधी मिळाली. दरम्यान या अपघातामुळं कितीजण प्रभावित झाले याचा अधिकृत आकडा मात्र अद्याप समोर आलेला नाही. या अपघातानंतर पुलावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली असून, तातडीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं. 


फ्रान्सिस की ब्रिज हा पूल 1977 मध्ये पेटाप्सको नदीवर बांधण्यात आला होता. अमेरिकेचं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट यांच्यावरून या पुलाला नाव देण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला जिथं हा अपघात धझाला त्या भागात नदीपात्रातील पाण्याचं तापमान 9 अंश असून, साधारण 21 अंशांहून कमी तापमानाचा शरीराला फटका बसतो त्यामुळं पाण्यात पडलेल्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसीज कंट्रोलकडून वर्तवण्यात आली आहे. 



हेसुद्धा वाचा : Viral News : रातोरात झाले लखपती! डहाणूकर मासेमारांना समुद्रातच लागली लॉटरी


जहाजाला धडक देणारं जहाज एक मालवाहू जहाज असून, त्यावर काम करणारे सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती जहाजाची मालकी असणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली आहे.