Omg! 9 महिने विसरून जा..; अवघ्या 1 तासाच्या गर्भधारणेत दिला बाळाला जन्म, कसा घडला चमत्कार?
VIRAL NEWS : एका विचित्र प्रेग्नेंसची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने दावा केला आहे की, गर्भधारणा केल्यानंतर अवघ्या एका तासात तिला बाळ झालं. या महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला आहे.
Trending News : आई होण्याचं सुख हे सर्वात सुंदर सुख आणि अस्मरणीय अनुभव असतो. गर्भात वाढणाऱ्या बाळासोबत आईचं नाळ जोडलेली असते. त्या नऊ महिन्यात आई आणि बाळाचं एक वेगळंच नातं असतं. हा अनुभव फक्त एक आईच समजू शकते. जगातील सर्वोत्तम परी सुख नऊ महिने आपल्या कुशीत वाढल्यावर त्याला जेव्हा हातात घेण्याचा क्षण येतो त्यावेळी जगातील सर्व सुख एकीकडे आणि आई होण्याचं सुख एकीकडे असतं. (viral news woman giving birth to miracle boy in just 1 hour pregnancy today Trending News)
नऊ महिने महिला गर्भाला आपल्या गर्भात वाढवते. पण तुम्ही कधी हे ऐकलं आहे का, गर्भधारणा झाल्या झाल्या एका तासात बाळ जन्माला आलं.
तुम्हाला वाटतं असेल की आम्ही गंमत करत आहोत. पण नाही एका महिलेने असा दावा केला आहे. ती महिला फक्त एका तासासाठी गर्भवती होती आणि तिने निरोगी बाळाला जन्म दिला आहे. निरोगी बाळ जन्मला येण्यासाठी बाळाला नऊ महिने आईच्या गर्भात राहवं लागतं. त्याची तिथे वाढ होते आणि नऊ महिन्यांनी तो या जगात येतो. या महिलेच्या दावानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काय नेमकं प्रकरण ?
झालं असं की, महिलेला आपण गरोदर आहे शेवटपर्यंत माहिती नव्हतं. कारण तिला नऊ महिनेदेखील मासिक पाळी येत होती. त्याशिवाय तिला गर्भधारणा झाल्यानंतरचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते.
आत्तापर्यंतची सर्वात लहान गर्भधारणा
या महिलेने असाही दावा केला आहे की, तिच्या पतीने 19 महिन्यांपासून तिला स्पर्शही केला नाही. तिने सोशल मीडियावर सांगितलं की,त्यांचा मुलगा चमत्कारापेक्षा कमी नाही.मुलाच्या जन्माची कहाणी सांगताना म्हणाली की, मुलाला जन्म देण्याच्या अवघ्या तासापूर्वी ती आपल्या पतीसोबत रोमान्स करत होती. यानंतर अचानक तिला पोटात काहीतरी हलत असल्याचं जाणवलं. तिच्या पोटात दुखू लागलं आणि तासाभरात तिने मुलाला जन्म दिला.
पीरियड्स सतत येत होते
महिलेने सांगितलं की, तिला नऊ महिनेही मासिक पाळी येत होती. शिवाय तिला या मुलाच्या अगोदर तिने दोन मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे गर्भधारणा झाली आहे असे कुठलेही संकेत तिला शरीरातून मिळत नव्हते. पोटही वर आलं नव्हतं. शिवाय तिला गर्भवती अवस्थेतील कुठलाही त्रास समस्या होत नव्हता. त्यामुळे आपण गर्भवती आहोत, हे तिच्या लक्षात आलं नाही.
कुठलीही आहे ही विचित्र घटना?
ही विचित्र घटना इंडोनेशियातील आहे. हे प्रकरण 2020 मधील असल्याचा दावा महिलेने केला आहे. तर तिचं नाव आहे हेनी नारायणी आहे. या घटनेच्या वेळी महिलेचं वय 28 वर्षांचं होतं.