एडिनबर्ग​ : जगात विचित्र गोष्टी घडत असतात. ज्याची आपण काही वेळा कल्पाना देखील करु शकत नाहीत. कधी कधी अशा बातम्या आपल्या समोर येतात, ज्यावरती विश्वास ठेवणे कोणालाही शक्य होणार नाही. सध्या अशीच एक विचित्र बातमी स्कॉटलंडच्या एडिनबर्गमधून समोर आली आहे. येथे दारु प्यायल्याने महिला लक्षाधीश बनली. आता तुम्ही असा विचार करत असाल की, नक्की हे प्रकरण आहे तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे आपल्याकडे भारतात कित्येक लोकं दारु पितात, परंतु तरीही कोणी असं लक्षाधीश होणं तर सोडा साधे शंभर रुपये देखील मिळत नाही. मग या महिलेला कसं काय पैसे मिळाले?


खरेतर ही घटना स्कॉटलंडच्या एडिनबर्गमधील आहे. येथे राहणारी मालगोर्जाता क्रोलिक (Malgorzata Krolik) नावाच्या महिलेने एक दिवस दारू पिऊन कार्यालय गाठले. मीडिया रिपोर्टनुसार, ही महिला एका कारखान्यात काम करायची. त्याची दुपारी दोन वाजता शिफ्ट सुरू व्हायची. तिने शिफ्टच्या 9 तास आधी म्हणजे सकाळी 5 च्या सुमारास दारू प्यायली होती.


शिफ्टला आल्यावर ही महिला दारु पिऊन आली आहे अशी माहिती मिळताच कंपनीच्या व्यवस्थापकाने तिला याबाबत प्रश्न विचारला. महिलेने तिने दारु प्यायले असल्याचे स्वीकारले. ही कंपनी अल्कोहोलबाबत टॉलरेंस पॉलिसी (Zero Tolerance Policy) स्वीकारते. अशा परिस्थितीत या महिलेला नोकरीवर ठेवणे शक्य नव्हते. आपल्या धोरणाचा हवाला देत कंपनीने महिलेला कामावरून काढून टाकले.


लाखो रुपयांची भरपाई


मालगोर्जाता क्रोलिकला (Malgorzata Krolik) नोकरीवरून काढून टाकल्यावर खूप राग आला. त्यानंतर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि प्रकरण पूर्णपणे उलटले. महिलेची याचिका ऐकून न्यायालयाने तिच्या हिताचा निर्णय दिला. यामुळे, त्या कंपनीने 5000 युरो म्हणजेच सुमारे 4 लाख 33 हजार 204 रुपये त्या महिलेला भरपाई म्हणून दिले.