बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला `ग्लू`, अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर
अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
viral News : घाई-घाईत किंवा निष्काळजीपणामुळे काहीवेळा आपल्या हातून मोठी चूक घडते आणि याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. काही वेळा हाच निष्काळजीपणा जीवावरही बेतू शकतो. अशीच काहीशी घटना एका महिलेबाबत घडली आहे. या महिलेने आय ड्रॉपऐवजी डोळ्यात 'नेल ग्लू' (nail glue) डोळ्यात टाकला. यानंतर महिलेसोबत जे घडलं ते भयंकर होतं. या महिलेने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून आपली कहाणी तीने फोटोबरोबर शेअर केली आहे.
या महिलेचं नाव जेनिफर एवरसोल (Jennifer Eversole) असं असून ती कॅलिफोर्नियाच्या सांता रोजा (Santa Rosa) या शहरात राहाते. जेनिफरला डोळ्यांच्या समस्येचा त्रास होता. यासाठी डॉक्टरने तिला डोळ्यात टाकण्यासाठी आयड्रॉप दिला होता. डोळ्यांचा त्रास जाणवल्यावर जेनिफर तो ड्रॉप टाकत असे. पण ज्या मेडिकल बॉक्समध्ये तीने आय ड्रॉप ठेवला होता. त्याच बॉक्समध्ये तीने चुकून नेल ग्लू ठेवला आणि इथेच घात झाला. दोन्ही ट्यूब साधारण एकसारख्याच दिसणाऱ्या होत्या. एकेदिवशी जेनिफरचे डोळे अचानक दुखू लागल्याने तीने घाईघाईत आयड्रॉप टाकण्यासाठी मेडिकल बॉक्स उघडला. पण चुकून तीने नेल ग्लूची ट्यूब घेतली आणि त्याचा ड्रॉप डोळ्यात टाकला.
पण यानंतर जेनिफरच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली. ग्लूमुळे तिच्या डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटला आणि डोळा बंद झाला. तीने डोळा उघडण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या डोळा उघडला नाही. तीने अनेक प्रयत्न करुन पाहिले पण तिला यश आलं नाही. शेवटी जेनिफरने रुग्णालयात धाल घेतली. जेनिफरची अवस्था पाहून रुग्णालयातील डॉक्टरही घाबरले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले. पण तिच्या डोळयांच्या पापण्या ग्लूने घट्ट चिकटल्या होत्या. त्यामुळे डोळा उघडणं जवळपास अशक्य होतं. अखेर डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांच्या पापण्या कापल्या, त्यानंतर तिचा डोळा उघडू शकला.
असं प्रकरण पहिल्यांदाच पाहिल्याचं रुग्णालयतील डॉक्टरांनी सांगितलं. ग्लू आणि आयड्ऱॉपची ट्यूब एकत्र ठेवल्याने हा गोंधळ झाल्याचं जेनिफरने कबुल केलं. या घटनेचा फोटो जेनिफरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याबरोबरच तीने एक पोस्टही लिहिली आहे. यात तीने म्हटलंय, निष्काळजीपणामुळे आपल्या हातून ही घटना घडली. डोळ्यात ग्लू टाकल्यानंतर माझी अवस्था खूपच वाईट झाली. आपला डोळा कायमचा बंद होणार अशी भीती मनात आली. पण डॉक्टरांच्या प्रयत्नाने मला नवं जीवनदान मिळालं, असं जेनिफरने म्हटलंय. तसंच निष्काळजीपणा आणि घाईघाईत कोणतंही काम करु नका असं आवाहनीह तीने लोकांना केलं आहे.