Online Love: ऑनलाईन साईट्सवर प्रेम होणं हे काही नवीन नाही परंतु त्यातून फसवणूकीच्या घटना घडणं काही कमी झालेलं नाही. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यानं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. ऑनलाईन डेटिंग साईट्सवर (Online Dating Sites) अनेकजणं एक्टिव असतात. त्यातून काही जणं या डेटिंग साईट्सला (Dating Fraud) गांभीर्यानं पाहतात तर काहीजण या साईट्सला टाईमपास म्हणून पाहतात. हल्ली डेटिंग साईट्सवर खूप मोठ्या प्रमाणात फसवणूकीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यातून महिलांसोबतच्या वाईट घटना घडतानाही फार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. (Viral Online Love Fraud with man young girlfriend to become grandmother exposed trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये महिलांच्या बाबतीत अशा घटना घडत असल्या तरी पुरूषांसोबतही घडताना दिसत आहेत त्यामुळे सध्या महिलांप्रमाणे पुरूषांच्या बाबतीतही खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होताना दिसते आहे. समोर आलेल्या प्रकारातूनही असंच एक धक्कादायक वास्तव (Shocking News) समोर आलं आहे. त्यातून या प्रकरणात एक तरूणीकडून तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना साऊथ चायना भागातील आहे. येथे एका 22 वर्षीय तरूणाची एका महिलेसोबत ओळख झाली. एकमेकांसोबत ते दिवसेंदिवस चॅटिंग करत होते.


त्यातून हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढू लागली आणि ते एकमेकांसोबत सलोख्याच्या गप्पा करून लागले मग त्यांना मात्र त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात (Friendship) करावंसं वाटलं आणि त्यांनी एकमेकांना प्रेमाची शपथ दिली. एक-दुसऱ्याला कधीच सोडणार नाहीत याअर्थी त्यांनी लग्नाचे (Marriage Purpose) वचनही एकमेकांकडून घेतले. 


प्रेमकहाणी सुरू होण्यापुर्वीच संपली... 


एकमेकांसोबत ऑनलाईन व्हिडीओ चॅट (Video Chatting) करणारे हे अचानक बोलण्याचे बंदच झाले. यामध्ये त्या मुलीनंच अचानक त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्यामुळे त्या मुलाला संशय आला आणि त्या मुलींचं भंग फूटलं. त्यातून अशावेळी ती एकदम बोलण्याचे बंद का झाले याबद्दल मुलाच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. त्यामुळे त्यानं तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिच्या घरच्यांशीही त्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिथंही तिचा काहीच कॉन्टेक्ट झाला नाही. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आणि ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड (Girlfriend) ही आजी होणार होती. ही बातमी ऐकताच त्या 22 वर्षीय तरूणाला मोठा धक्का बसला. त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. 


हेही वाचा - पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...


तेव्हा त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कसाबसा त्याचा फोन लागला आणि तेवढ्यात तिनं फोन उचलला. यावेळी तिनं सगळी हकिकत त्याला सांगितली आणि तरूणाला (Boyfriend-Girlfriend Fraud) मोठा धक्काच बसला यावेळी मात्र त्या दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि तो मात्र कुंवाराच राहिला.