Nurse And Patient: हॉस्पीटल उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाबरोबर (Patient) तिथल्या नर्सचे (Nurse) प्रेमसंबंध जुळले. हॉस्पीटलमध्ये दोघं चोरुन भेटूही लागले. हॉस्पीटलच्या (Hospital) नियमांविरोधात जाऊन नर्सने रुग्णाशी प्रेमसंबंध ठेवले. मध्यरात्री सगळ्यांची नजर चुकवून दोघंजणं हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये रोमान्स करत असताना अचानक रुग्णाचा मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पीटलमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण इंग्लंडमधलं असून पेनेलोप विलियम्स असं नर्सचं नाव आहे. 2019 पासून पेनेलोप ही नॅशनल हेल्थ सर्व्हिस (National Health Service) रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी या रुग्णालायत एक रुग्ण उपचारांसाठी दाखल झाला. या रुग्णावर नर्स पेनेलोप हिचा जीव जडला. दोघंजण भेटू लागले, कॉल, मेसेवर वर त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. इतकंच काय अनेकवेळा दोघंजण हॉस्पीटलच्या पार्किंगमध्येही भेटत होते. 


घटनेच्या दिवशी दोघंही असेच सगळ्यांची नजर चुकवून हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये रोमान्स (nurse physical relationship) करत होते. यावेळी अचानक रुग्णाला हार्टअटॅक आला. रुग्णाची अवस्था पाहून पेनेलोप घाबरली. भीतीने तीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. त्यामुळे उपाचाराअभावी रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पाहातच पेनेलोपने आपल्या एका सहकाऱ्याला बोलवून त्याला CPR देण्यास सांगितलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. 


हे प्रकरण हॉस्पीटल प्रशासनानेपर्यंत पोहोचलं. हॉस्पीटल प्रशासनाने कठोर भूमिका घेत नर्स पेनेलोपला नोकरीवरुन निलंबित केलं. तसंच तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या रुग्णाने आपल्याला फेसबूक मेसेज करुन भेटायला बोलावलं, गप्पा मारत असताना असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं, असा दावा पेनेलोपने पोलिसांसमोर केला. पण तपासाअंती हा दावा खोटा ठरला. 


पेनेलोपचा मोबाईल तपासला असता तीनेच रुग्णाला भेटायला बोलावल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोघांनी कारमध्ये संबंध ठेवले. यादरम्यानच त्याला हार्टअटॅक आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. याआधीही दोघं रिलेशनशिपमध्ये होते असा खुलासा झाला आहे. पण पेनेलोपणे शरीरसंबंधांचा इन्कार केला आहे.  याप्रकरणी हॉस्पीटल प्रशासनाने एक तपास समिती स्थापन केली आहे. हॉस्पीटलच्या नियमांविरोधात जाऊन नर्सने केलेल्या कृत्यांबाबत कठोर कारवाई केली जाणार असल्याचं हॉस्पीटल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.