ऐशलॅंण्ड : प्रेम मिळविण्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो.  सोशल मीडियावर एक प्रेम कहाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉयफ्रेंडच्या आठवणीत स्वत:चे नाव आणि नंबर एका बॉलवर लिहून तो बॉल बॉयफ्रेंडच्यानावे तरुणीने समुद्रात फेकला होता.


६ वर्षानंतर तोच बॉल ट्विटर पोस्टमध्ये पाहायला मिळाला आणि तिच्या आशा पल्लवित झाल्या.


बॉलवर लिहिले नाव आणि नंबर  



अमेरिकेतील ऐशलॅण्डमध्ये एका तरुणीने ६ वर्षांपूर्वी आपले नाव आणि नंबर बॉलवर लिहून समुद्रात फेकून दिला होता. तो बॉल बॉयफ्रेंडला सापडेल आणि कदाचित आपली भेट होईल असे तिला वाटले होते. बॉयफ्रेंडचा शोध घेण्यासाठी हॅली रॉबिसला हाच पर्याय सुचत होता. 


ट्विट शेअर 


६ वर्षांनंतर ऐडम नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यासोबत त्या बॉलचा फोटोदेखील होता. हॅलीने ही गोष्ट ट्विटरवर शेअर केली. खूप लोकांनी हे ट्विट शेअर केले. 


ती केल्सी होती


हॅलीने उत्साहित होऊन एडमकडे त्याचा स्नॅपचॅट आयडी मागितला. यानंतर हॅलीला समजले एडम नावाचा कोणी तरुण नाहीए तर केल्सी नावाची ती तरुणी होती.



नाव, नंबरकडे लक्ष 


नॉर्थ कॅरोलीना येथे राहणाऱ्या कॅस्ली ला हा बॉल ६ वर्षांपूर्वी सापडला होता. तिच्या घरी खूप वर्षे तो बॉल पडून होता. साफ सफाई करताना त्या बॉलवरच्या नाव आणि नंबरकडे तिचे लक्ष गेले


एडम बनून गप्पा 


त्यानंतर तिने एडम बनूनन हॅलीशी गप्पा मारल्या. पण ती प्रेमकहाणी संपलीच हे हॅलीच्या लक्षात आले. पण हॅली आणि कॅस्ली दोघींची मैत्री झाली.