आई होणं हे प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न असतं. अनेक महिलांची तर हा देवाचा आशीर्वाद असल्याची भावना असते. आपला अंश या जगात वावरताना पाहण्याचं सुख काही वेगळंच असतं. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर जेव्हा ते मूल जगात येतं तेव्हा त्यासाठी ती आई ईश्वरसमान असते. आई होण्याचं सुख मिळावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण जर एखाद्या महिलेने लग्नानंतर पतीकडे आई होण्यासाठी मागण्यांची यादीच ठेवली तर तुम्ही काय म्हणाल. दुबईतील असं एक प्रकरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईत राहणाऱ्या एका महिलेने मूल जन्माला घालण्याच्या बदल्यात पतीकडे खूप सारा पैसा, आलिशान राजवाडा यासह अनेक गोष्टी मागितल्या आहेत. महिलेचा पती अरबपती आहे. ही महिला आपल्या महागड्या सवयी आणि पैसा खर्च करण्यामुळे अशीही चर्चेत असते. 


महिलेने पतीकडे केलेल्या मागण्या पाहून तुम्ही तोंडात बोटं घालून घ्याल. यामध्ये बूर्ज खलिफावर जेंडर रिवील पार्टीसाठी 1 लाख डॉलर्स, अमेरिकेतील टॉप सर्जन्सकडून मेकओव्हर करुन घेण्यासाठी 1 लाख 50 हजार डॉलर्स, मुलीसाठी ब्रँड कपड्यांचं कलेक्शन, मुलासाठी सुपर बोट आणि 20 बेडरुमचा राजवाडा यांचा समावेश आहे. 


सौदीर अल नदक नावाच्या या महिलेने आपल्या इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, "मला वाटतं हे अगदी योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं?". तसंच व्हिडीओच्या टेक्स्टमध्ये लिहिलं आहे की, 'जेव्हा मला मूल होईल तेव्हा अरबपती पतीकडून या गोष्टींची मी अपेक्षा करते'. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Soudi (@soudiofarabia)


महिलेची पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काहींनी महिलेच्या मागण्यांना विरोध केला आहे. यात सन्मान आणि सहानुभूती यांची कमतरता जाणवत आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तर एका युजरने असा कंटेंट शेअर केल्याने स्थानिक चित्र, परंपरा याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. 


ही महिला आपल्या अलिशान जीवनशैलासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. कधी ती करोडोंची खरेदी करताना तर कधी लक्झरी गाड्यांसह दिसते. महिलेच्या मते एखाद्या अरबपतीशी लग्न करणं हे एखाद्या फूल टाइम नोकरीसारखंच आहे.