बिजिंग: अलीकडेच चीनमध्ये एका लिफ्टचा मोठा अपघात टळला. प्रत्यक्षात लिफ्टच्या दारवाज्यात पाळीव कुत्र्याचा पट्टा अडकला आणि लिफ्ट सुरू लागली. सुदैवाने त्याच वेळी एक डिलिव्हरी बॉय तिथे पोहोचला आणि त्याने कुत्र्याचा जीव वाचवला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण या डिलिव्हरी बॉयचे खूप कौतुक करत आहेत. यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या हुबेई प्रांतात 23 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. याचे एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, जे स्थानिक वेबसाइट साउथ चायना मॉर्निंग पोस्टने त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लिफ्टचा दरवाजा उघडतो, तेव्हाच एक पाळीव कुत्रा त्यात प्रवेश करतो. त्यानंतर लिफ्ट खाली जाते तेव्हा त्याच्य पट्टा वरतीच राहतो. आपण पाहू शकता की कुत्र्याच्या मानेभोवती एक पट्टा आहे, जो लिफ्ट चालू झाल्यावर तो पट्टा त्यांना वरच्या दिशेने खेचू लागतो. हे खरोखरच भयानक दृश्य आहे.


पट्ट्याची दोरी वर जाते तेव्हा हा कुत्रा ओरडू लागतो. त्यानंतर खालच्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि तिथे उपस्थित असलेल्या एक डिलिव्हरी बॉय त्याचे प्राण वाचवतो. तो त्या कुत्र्याला पकडतो आणि त्याच्या गळ्यातील पट्टा काढतो.


नशीबाने तो डिलिव्हरी बॉय खालच्या मजल्यावरती असतो. नाहितर ती लिफ्ट आणखी खाली गेली असती तर त्या बिचाऱ्या कुत्राचे प्राण गेले असते.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण डिलिव्हरी बॉयच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडताच डिलिव्हरी बॉयने कुत्रा दोरीला लटकलेला पाहिल्यानंतर तो प्रथम घाबरला. मग कुत्र्याला त्रास होत असल्याचे आणि तो संकटात असल्याचे त्याच्या लक्षात येताच तो त्याला ताबडतोब आपल्या हातात घेऊन त्याचा पट्टा काढतो.



व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, डिलिव्हरी बॉयने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, ते कौतुकास्पद आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा कुत्रा खूप भाग्यवान होता, ज्याला या डिलिव्हरी बॉयने शेवटच्या क्षणी वाचवले. या व्यक्तीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.'' याआधी 2019 मध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. जिथे लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला होता. त्यानंतर जॉनी मॅथिस नावाच्या 27 वर्षीय मुलाने त्याचा जीव वाचवला होता.