Ashadhi Wari 2024: कुठे 'जगन्नाथ' तर कुठे 'सारंगपाणि', विठ्ठलाच्या मंदिरांचा रंजक इतिहास

Famous Vitthal Temples in India: 'विष्णू'चा अवतार म्हणून 'पंढपुरी'च्या 'विठोबा'ला ओळखलं जातं तसंच विविध राज्यात ही वेगवेगळ्या नावाने विष्णूची जागृत देवस्थानं आहेत.  'पंढरीच्या राजा, विठ्ठल सावळा' महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या, पंढरपुरीच्या माऊलीची वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली पंरपरा आहे. हिंदू पुराणानुसार असं म्हणतात की, विष्णू हा 'विठ्ठल' अवतारात पंढरीत स्थिरावला.जसं  महाराष्ट्रात विठ्ठल नावाने विष्णू देवाला पुजलं जाचं तसंच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने भगवान विष्णूची पुजा केली जाते. 

Jul 03, 2024, 13:10 PM IST
1/8

जगन्नाथ मंदिर, ओडीशा

आठव्या शतकात 'आदि शंकाराचार्यां'नी या मंदिराची स्थापना केली.  हे प्रचीन मंदिर समुद्राच्या बाजूला आहे. उत्कृष्ठ स्थापत्त्यशैलीचा हा उत्तम नमुना आहे. 'जगन्नाथ' हा 'विष्णू'चा अवतार मानला जातो. त्यामुळे इथे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.   

2/8

द्वारकाधीश, गुजरात

द्वारकेचा राजा म्हणजे 'द्वारकाधीश'. सुमारे 2200 वर्षांपुर्वीचं हे प्रचीन मंदिर आहे. असं म्हणतात की, श्रीकृष्णाच्या नातवाने या मंदिराची स्थापना केली.या मंदिराची कलाकुसर मन वेधून घेतं. 'द्वारकाधीश मंदिर' परिसरात 'रुक्मिणी'चं मंदिर आहे.  अथांग समुद्र आणि भक्तीरसात न्हाऊन गेलेलं द्वारकाधीश मंदिर, म्हणजे एकाच वेळी निसर्ग आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम पाहायला मिळतो. 

3/8

व्यंकटेश्वर मंदिर, आंध्रप्रदेश

हिरव्या शालूने नटलेल्या तिरुमाला डोंगरावर वसलेलं संगमरवरी श्री व्यंकटेश्वर हा विष्णूचा अवतार मानला जातो. आंध्रप्रदेशातील हे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. दाक्षिणात्य शैलीत साकारलेल्या या मंदिरात भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात. 

4/8

विठ्ठला मंदिर, हंपी

हंपी शहराला पुरातन मंदिरांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील अनेक भागात पांडुरंगाला 'विठ्ठला' नावाने ओळखलं जातं.हा  'विठ्ठला' आणि पंढरपुरतील 'विठ्ठल' हे एकच असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचा कालखंड हा कृष्णदेव रायांच्या काळातील असल्यांचं म्हटलं जातं. 

5/8

रंगनाथस्वामी मंदिर , तामिळनाडू

दाक्षिणात्य पारंपारिक पद्धतीने साकारलेलं आहे. भारतातील भव्य दिव्य मंदिरांपैकी एक रंगनाथस्वामींचं मंदिर आहे. दिवाळीत या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. याला 'ओंजल उत्सव' असं म्हणतात. विष्णूचा अवचार असलेल्या या मंदिराच्या भिंतींवर संस्कृत,मराठी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेतील 800 पेक्षा जास्त शिलालेख आढळतात. 

6/8

लक्ष्मीरामन स्वामी मंदिर, म्हैसूर

म्हैसूर शहराला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे, तसंच धार्मिक परंपरेचा वारसा देखील लाभला आहे. म्हैसूरमधील 'लक्ष्मीरामन स्वामी मंदिर' हे सर्वात प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं.गाभाऱ्यातील मनमोहक 'लक्ष्मी आणि विष्णूची' मूर्ती डोळ्यांचं पारणं फेडते. 

7/8

सारंगपाणि मंदिर, केरळ

'कावेरी' नदीच्या तिरावर वसलेलं हे 'सारंगपाणि मंदिर' केरळचं वेगळेपण दर्शवते. 'सारंगपाणि'मंदिराची वास्तुकला ही 'द्रवीड' स्थापत्यशैलीमधली आहे. संस्कृतमध्ये 'सारंग' म्हणजे 'विष्णू' आणि 'पाणि' म्हणजे 'सुदर्शन चक्र हातात घेतलेला'. याच सुदर्शन चक्र हातात घेतलेल्या विष्णूच्या मुर्तीला भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात.   

8/8

श्री नाथजी मंदिर , राजस्थान

या मंदिराची स्थापना 17 व्या शतकात झाल्याची सांगितलं जातं. वैष्णव संप्रदायात या मंदिराला मोठं महत्त्व प्राप्त आहे. असं म्हणतात की, भगवान विष्णू हे राजस्थानमध्ये 'श्री नाथजी'च्या रुपात प्रकट झाले होते. या मंदिराचं साधेपण मनाचा ठाव घेतं. 'श्री नाथजींचं' दर्शन घेण्यास भाविक मोठ्या संख्येने येतात.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x