Viral Video : कुत्रे आणि मांजरी पाळण्याची आवड अनेकांना असते. कदाचित तुमच्या घरीही एखादा पाळीव प्राणी असेल. अनेक जणं आपल्या घरात असलेल्या मांजरीचे खूप लाड करतं. रात्री झोपताना बरेचजण आपल्या मांजरीला सोबत घेऊन झोपतात. मात्र तुम्ही कधी बिबट्याला सोबत घेऊ झोपायचा विचार केलाय का? विचार सोडा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे विस्फारतील...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्या म्हटलं की अनेकांना काळजाचा टोका चुकतो. सध्या बिबट्याचे लोकांच्या वस्तीत घुसण्याचे तसंच माणसांवर हल्ला करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. मात्र तुम्ही विचार करा, चक्क बिबट्याचं अख्खं कुटुंब जर कोणी कुशीत घेऊन झोपत असेल तर. 


एक असा वनरक्षक आहे जो बिबट्यांच्या कळपाला रात्री सोबत घेऊन झोपतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. Ir.Kumar यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे.



दरम्यान हा व्हिडीओ नेमका कोणत्या वन विभागातला आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र प्राणीप्रेमींना हा व्हिडीओ खूपच आवडला असून यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.


काय आहे नेमकं या व्हिडीओमध्ये?


या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे बिबट्याचं अख्खं कुटंब एका वन रक्षकासोबत झोपल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, वन रक्षक झोपलाय. त्याच्या कुशीत काही बिबटेही झोपले आहेत. यावेळी एक बिबट्या उठतो आणि वनरक्षकाच्या कुशीत जाऊन झोपतो. काही वेळानं दुसरा बिबट्या पण उठतो आणि त्या व्यक्तीच्या पायाजवळ जाऊन झोपी जातो. इतकंच नाही तर काही वेळाने तिसऱ्या बिबट्या उठतो आणि इतर बिबट्यांच्या मध्येच घूसुन त्या व्यक्तीजवळ जाऊन झोपतो.