मुंबई : लोकं त्यांच्या घरी काय बनवतील याचा काही नेम नाही. सहसा काही मोठ्या घरांमध्ये स्टोअर रूम वैगरे आढळतात परंतु एखादी सिक्रेट रुम वैगरे आपल्याला कमीच पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घरामध्ये एक सिक्रेट बोगदा आहे. तो ही अशा ठिकाणी ज्याचा कोणाला थांग पत्ता देखील लागणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण या सिक्रेट जागेचा दरवाजा या व्यक्तीच्या पलंगामधूनत गेला आहे. त्यामुळे कोणालाही या जागेबद्दल समजणार नाही आणि कोणाला संशय येणार नाही.


एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या पलंगामध्ये एक बोगदा आहे. जो खूप लांब आणि मोठा आहे. सुरुवातीला या पलंगाखाली काही पायऱ्या आहेत आणि खाली गेल्यानंतर काही अंतरावर बोगदा सुरू होत आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला जागेच्या बरोबरीची एक खोली दिसेल जिथे आपण बेडरूमसारखे राहाता येईल.


बोगद्यात भिंतीच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे दिवे लावण्यात आले आहेत. असे म्हटले जात आहे की हा संपूर्ण बोगदा तयार करण्यासाठी बराच काळ लागला आहे.हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. हा सिक्रेट बोगदा पाहिल्यानंतर लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही यूझर असे म्हणत आहेत की, 'जेव्हा पोलिस छापा मारतील तेव्हा त्यांनी बिछाना हटवला तर?' यावर आणखी एका यूझरने सांगितले की, 'ओसामा बिन लादेन या बोगद्यात लपून बसला होता.'