Beautful Lady Police : शहराशहरात, गावपातळीते गल्लीबोळ्यात कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलिसांकडे असते. कायदा आणि शांतता राखण्याचं काम ते 24/7 करत असतात. ना ऊन ना पाऊस कशाचीही पर्वा न करता ते देशाची रक्षा करतात. सोशल मीडियावर पोलिसांचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. कधी तो पोलीस कर्मचारी गाणं गातो तर कधी डान्स करताना दिसून येतो. तर कधी त्यांचा जाबाज अंदाज या व्हिडीओमधून दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सध्या सोशल मीडियावर एका सुंदर पोलीस महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ही महिला पोलीस दिसायला अतिशय सुंदर आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती पोलीस वर्दीत असताना एका परिसरात उभी असून एका तरुणाला काही तरी समजव आहे. त्याला धीर देण्याचा ती प्रयत्न करत आहे. 


त्या तरुणाला धीर देताना ती महिला त्याचा गालावरुन हात फिरवते. ती अतिशय प्रेमळ आणि नम्रपणे संवाद साधते. पण अचानक तो तरुण तिला मिठी मारतो आणि गालावर किस करतो. हे पाहून लेडी पोलीस अवाक् होतो आणि आजूबाजूचे लोक त्या तरुणाला ओरडतात. एक व्यक्ती तर त्याला मारायला धावतो. (viral video man hugging kisses beautiful lady police trending on on Social media watch now)


पण तरुणाच्या या कृत्याने महिला पोलीस नाराज न होता हसायला लागते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sanscari ladka या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर नेटिझन्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहे.



महिलेच्या वर्दीवरुन हा व्हिडीओ बांगलादेशचा असू शकतो. कारण बांगलादेश पोलिसांचा गणवेश निळा रंगाचा आहे.