हा उडणारा व्यक्ती खराखुरा `Harry Potter` तर नाही ना? पाहा व्हिडीओ
या व्यक्तीला हवेत उडताना पाहून नक्कीच तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
मुंबई : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. इतकचं नाहीतर आपला जीवही धोक्यात घालायची अनेकांची तयारी असते. काहीजण तर असे कारनामे करतात की, त्याला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. असाच एका व्यक्तीने कारनामा केला आहे, ज्याला पाहून तुम्ही थक्कं व्हाल.
तुम्ही हवेत उडणारा माणूस सिनेमातच पाहिला असणार. खऱ्या आयुष्यात तर असे होणे शक्य नाही. परंतु न्यूयॉर्कमध्ये एका उडणाऱ्या माणसाला पाहिले गेले आहे. ज्यामुळे येथील अनेक लोकांना धक्का बसला आहे, तर अनेकांनी हे दृष्य आपल्या फोनमधून टिपले आणि त्याला सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या व्यक्तीला हवेत उडताना पाहून नक्कीच तुम्हाला नक्कीच झटका लोगला असेल. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा माणूस एखाद्या जादूगारा प्रमाने हवेत उडतो आणि एखाद्या ड्रोनसारखा होवरबोर्डवर सवारी करत हवेत उडत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरच्या 'Rex Chapman' नावाच्या अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ न्यूयॉर्क शहरातील असल्याचं समजतंय. ही बातमी लिहिण्यापर्यंत सुमारे 80 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.