Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात ओढली गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने तिथे उपस्थित एका व्यक्तीने धाडस करत समुद्रात उडी मारली आणि मुलीला वाचवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी...; Viral VIDEO


 


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं समुद्रकिनारी असणाऱ्या पायऱ्यांवर खेळताना दिसत आहेत. यावेळी समुद्र खवळलेला दिसत असून, लाटाही उसळत होत्या. मात्र असं असतानाही मुलं आपला जीव धोक्यात घालत पुढे जाऊन खेळत होती. दरम्यान, यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण सुटलं आणि रेलिंगमधून ती खाली पडली. 


The North Devon Council ने हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. यावेळी त्यांनी भरती-ओहोटीचा सामना करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. "समुद्राची परिस्थिती सतत बदलणारी आणि अस्थिर असू शकते. त्यामुळे कृपया किनारपट्टीवर लक्ष द्या," असं काऊन्सिलने सांगितलं आहे. 



"ही घटना गुरुवारी संध्याकाळी इल्फ्राकॉम्बे हार्बर येथे घडली. जर काही नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नसता तर मोठी गंभीर घटना घडली असती," असंही त्यांनी सांगितलं आहे. 3 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता भरतीच्या वेळी ही घटना घडली होती. 


दरम्यान सुदैवाने तिथे खेळणारी मुलं जखमी झाली नाहीत. काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, "सुदैवाने, यात सहभागी झालेल्यांना फक्त किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर Ilfracombe RNLI द्वारे उपचार केले गेले आहेत. अस्थिर परिस्थितीत स्लिपवेच्या आसपास खेळणं धोकादायक असू शकतं. आम्ही लोकांना बंदरावर सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन करतो".