Viral Video: अजगराला चाबकाप्रमाणे हातात पकडून तुफान हाणामारी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Viral Video: रस्त्यावर मारामारी करताना एकाने चक्क अजगराला (Python) शस्त्र असल्याप्रमाणे हातात पकडत एका व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, अनेकांना धक्का बसला आहे. कॅनडात (Canada) ही घटना घडली आहे.
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. याचं कारण या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क अजगराला (Python) शस्त्र असल्याप्रमाणे हातात पकडून एकाला मारहाण करत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कॅनडामधील (Canada) टोरंटो ही घटना घडली आहे. CBC News ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी Dundas Street West आणि Manning Avenue परिसरात हा प्रकार घडला.
व्हिडीओत रस्त्यावर तुफान हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. यावेळी एकजण हातात चाबूक असल्यासारखा समोरील व्यक्तीवर तुटून पडलेला असतो. तर समोरील व्यक्ती आपला बचाव करत होती. पण तरीही तो थांबत नाही. रस्त्याच्या मधोमध ही मारामारी सुरु असते. यावेळी तिथे पोलिसांची गाडी पोहोचते आणि भांडण थांबवतात. यावेळी नीट पाहिलं तर मारणाऱ्या व्यक्तीच्या हातात चक्क अजगर असतो. पोलीस येताच तो हातातील अजगर खाली फेकून देतो.
ट्विटरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "टोरंटो येथे रस्त्यावरील भांडणादरम्यान या व्यक्तीने आपल्या पाळीव अजगराचाच वापर केला".
पोलिसांनी याप्रकरणी निवेदन जाहीर करत माहिती दिली आहे की, एक व्यक्ती अजगराची भीती दाखवत लोकांना धमकावत असल्याचा फोन आला होता. यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी अधिकाऱ्यांना पाठवलं. दरम्यान यावेळी हाणामारी करताना त्याने पीडित व्यक्तीला अजगराच्या सहाय्याने मारहाण केली.
मारहाण करणाऱ्या या व्यक्तीची ओळख पटली आहे. 45 वर्षीय Laurenio Avila टोरंटोचा रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे. शस्त्राचा वापर करत हल्ला केल्याचा आणि प्राण्याला विनाकारण त्रास दिल्याच्या गुन्ह्याखाली त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 11 मे रोजी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.
हा व्हिडीओ शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 14 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून, 43 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच 5000 हून जास्त जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. अनेकांनी हा प्राण्यावरील अत्याचार असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहीजणांनी आपण आयुष्यात कधीच अशी घटना पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी अजगराची सध्या काय स्थिती आहे याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एका युजरने म्हटलं आहे की, "हा प्राण्यावरील अत्याचार आहे. साप आणि पक्षांना पाळणाऱ्यांचा मला प्रचंड राग येतो. याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे".